खरा वारसदार कोण ही सत्यता.
खरा वारसदार
I changed Thinking. उदा. एखादा परिवार दिसला की त्याचं चांगलं सुखात चाललं आहे; मुलांसाठी आई बाप मरायला तयार आहेत. तिथे जाऊन मी तर खरं तेच बोललो, खोटं बोललोच नाही. मी आई-बापाशी खरच बोललो, 'आहो तुमचं ऐन उमेदीचं वय आहे . मुला बाळांच्या मागे पडलात तर तुमचं पण जीवन आहे की नाही? तुम्हाला काही हाऊस मौज आहे की नाही? ते सोडून मुलांसाठी काय करायचं! मुलांचं प्रारब्ध असेल ते होईल.' लोकांना ते आवडलं. लोकांनी ते उचललं. मुलांच्या मागे लागायचं नाही. मग क्लब सुरू झाले. मुलांना जे करायचं ते करू द्या. माझं पण life आहे. मला जगायचं आहे. I want to enjoy my life. क्लब आणि क्लब, बस! मुलांकडे लक्ष नाही. मग एक Philosophy पैदा झाली. मुलांना संभाळणे परिवाराचं काम नाही, सरकारचं काम आहे. आज पण सगळे म्हणतात, सरकार शिक्षण देत नाही. मग तुझ्या घरात काय मिळतं? सरकार शिक्षण देईल अशी Philosophy उभी झाली . कुटुंबात ती स्वीकारली गेली . सैतानी वृत्ती येऊ लागली.
नंतर मी पती-पत्नींना भेटलो. त्यांना म्हणालो, 'एकासाठी दुसऱ्याने मरण चांगले आहे का? अरे तुमचं पण जीवन आहे. म्हणून कोणाशी एकरूप होण, दुसऱ्यासाठी समर्पण करण किंवा एखाद्याच्या तालावर नाचण ही गुलामी आहे.' त्यांना माझं म्हणणं आवडलं. बस्! मग परिवारात एक भावना आले की गुलामी वृती नको परिवार तुटला आणि सैतान घुसला.
पुढे मी शिक्षणसंस्थेत गेलो आणि फक्त शिक्षकांना म्हणालो, 'तुमच्याकडून उत्कृष्ट शिक्षण घेणारे उद्या लाख रुपये कमवणार आहेत; पण तुम्हाला काय मिळणार? तर आजच कमावून घ्या. उद्या तुमचे विद्यार्थी इंजिनियर बनतील, डॉक्टर बनतील, तर तुम्हाला काय मिळेल? तुम्हाला तुमचं पाहायला पाहिजे की नको? त्यांना ते पटलं. पूर्वी प्रेमाने, आत्मियतेने शिकवत ते बंद झालं. मग मुलांना जाऊन सांगितलं, आचार्य देवो भव ही गुलामी होती आहे. गुरु वगैरे outdated विचार आहेत. गुरुला पगार मिळतो म्हणून तर शिकवतो. मुलांच्या डोक्यात पण हे पक्क झालं. विद्यालय तुटलं.
मग मी गावात फिरलो. गावात सगळे एका वृत्तीने, एका विचाराने राहत होते. तेव्हा एकाला सांगितलं, 'तुला किंमत का मिळत नाही? त्याची जेवढी शक्ती आहे तेवढीच तुझी पण आहे. तुला पण किंमत मिळाली पाहिजे. तू स्वतःच पहा.' मी खरं तेच सांगितलं म्हणून दोन लोक उभे राहिले आणि पार्टी बनली. आणि गावात एकच विचार होता तो मेला. सैतानी वृत्ती आली. तेव्हा सैतान म्हणाला की, हा धकटा लेक माझा वारसदार आहे. सर्वात चांगल काम करून तूच काय तो आला आहेस.
Kup chan👌🌹🙏
ReplyDelete