आचार्य ही ज्ञानाची गंगा

आचार्य ज्ञानाची गंगा
    
शिष्य गुरुजवळ स्वतःची भावना व्यक्त करत म्हणतो, 'मी असंंस्कारी जीव होतो, मला तुम्ही संस्कारी बनवून जीवनाची खरी दृष्टी दिली, हिम्मत दिली. माझ्या चमड्याचे जोडे करून घातले तरी ते कमीच आहे. तुमच्याजवळ सतत राहण्याची माझी इच्छा आहे. परंतु मला जर जायचेच असेल तर मी असाच एखाद्या फुकाट्यासारखा का जाऊ? त्यासाठी श्रुती सांगते. आचार्यांना जे प्रिय असेल त्यांना दे. परंतु आचार्य स्वतःला काय प्रिय आहे ते कधी सांगत नाहीत. कधी मागणारही नाहीत. मला काय मिळेल त्या दृष्टीने ते कधी शिकवत नाहीत. आचार्य तर ज्ञानाची गंगा आहेत. गंगा कधीही विचार करत नाही की माझ्या पात्रात कोणी दिडकी टाकले की नाही. तर मग आचार्यांना काय द्यायचे ह्या समस्येची उकल करताना श्रुती सांगते की, 'आचार्यांना धन दे ' त्या काळात जे काही चलन असेल त्याप्रमाणे दे. नंतर सुचवते सुंदर, गुणवान, सुशील स्त्रीशी विवाह करून सुखी संसार कर. आपल्या शास्त्रकारांनी वैदिकांना संसार करण्याची आनुज्ञा दिली आहे. परंतु आचार्य आपल्या शिष्याला धोक्याची सूचना देताना सांगतात की, तू संसारात पडशील, लग्न करशील पण संसारात गुंतून पडू नकोस.
शरीर माझा आत्मा, बायको माझी गुरु मुलगा माझा शालिग्राम, सेवा कुणाची करू. असे तुझ्या संसाराला रूप येता कामा नये. घराच्या चार भिंतीतच तू बांधला जाऊ नकोस. आणि लक्षात ठेव सत्यान्न प्रमदितव्यम्|

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन