गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:| गुरु: साक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः||

व्यास समाजाचे खरे गुरु होते. म्हणूनच परंपरागत व्यास पूजा ही गुरु पूजा मांनली गेली व व्यास पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली. निर्जीव वस्तूवर भेटण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज भासते तशीच साधारणता जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे पाठविण्यासाठी जिवंत व्यक्तीची आवश्यकता भासते. ही व्यक्ती म्हणजेच गुरु. मानवाला देव बनवण्यासाठी स्वतःच्या पशुटुल्य वृत्तीवर संयम ठेवावा लागतो. ही संयमाची प्रेरणा त्याला गुरूच्या जीवनातून मिळत असते. गुरु म्हणजेच जो लघु नाही, आणि जो लघुला गुरु बनवतो तो. जो जीवनाला मनाच्या ताब्यात जाऊ देतो तो लघु आणि जो मनाच्या स्वामी बंद होतो तो गुरु. गुरु वजनदार असला पाहिजे. जीवनाच्या घसरत जाणाऱ्या प्रवाहातही जो स्थिर उभा राहू शकतो तो गुरु. कनक, कांता किंवा कीर्ती यांची वावटळ त्याला उडू शकत नाही आणि म्हणूनच तो अस्थिर व अव्यवस्थित मनाच्या मानवाचा मार्गदर्शक बनतो.
   
आज गुरु पूजा 'गुरुवादात' परिवर्तित झालेली आहे. गुरु पूजेचा गुरुवाद झाल्यामुळे मानव अंधश्रद्धा व अज्ञान यांच्या अंधारात आदळत आपटत आहे. गुरु पूजेचे सुंदररित्या फुललेले व सुगंधाने दरवळणारे पुष्प गुरु वादाने कोमेजून गेलेले आहे, कुस्करलेले गेले आहे. गुरुपूजन म्हणजे ध्येयपूजन. गुरुचे जीवन ध्येयमूर्ती सारखे असले पाहिजे. ध्येयाचा साकार रूप असते. मानवाच्या जीवनात ध्येय येतात संयम येतो. संयमाने शक्ती संग्रह होत जातो आणि या शक्तीनेच मानव ध्येयाच्या जवळ जातो आणि शेवटी त्याचा साक्षात्कार होतो.
    
अज्ञानाचा अंधकार निवारण्यासाठी ज्ञानाची ज्योत पेटवणारा गुरु व जीवन विकासाची कामना राखणारा शिष्य यांचा संबंध अलौकिक असतो. गुरु जवळ बसून शिष्य नम्रता, जिज्ञासा व सेवा यांच्याद्वारे गुरु जवळ असलेले ज्ञानामृत पितो. गुरु हा तर शिष्याच्या जीवन ग्रंथावरील 'पेपरवेट' आहे. यांच्यामुळे वाचनाच्या विकार विचारांनी शिष्याच्या जीवन पुस्तके ची पाने उडून जात नाहीत.
      
गुरूच्या उपकाराने ज्याचे हृदय भरून आलेले आहे असा कुण्या मानवाने गायले आहे की, 
         गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:|
         गुरु: साक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः||
     ब्रह्मदेवाप्रमाणे सदगुणांचा निर्माता; विष्णू प्रमाणे सदवृतीचा पालक व महादेवाप्रमाणे दुर्गुण व दूरवृत्तीचा संहारक असा जीव यांचे मिलन करणारा गुरु हा साक्षात परब्रम्हा समान आहे. अशा गुरुचे पूजन हे भारतीय संस्कृतीचे सुमधुर व भावाद्र काव्य आहे. गुरूजवळ पोहोचतात बुद्धी ग्रहणशील बनते. त्याचा सहवासच इतका मधुर असतो की त्याच्यापासून दूर होणे मनातच येत नाही. त्याच्या एका स्मिताने वर्षानुवर्षीचा थकवा दूर होतो. त्याची कृपादृष्टी पडताच मनाची मलिनता दूर होते. अशा गुरुचे पूजन ही भारतीय परंपरा आहे.
    
 ज्ञान देणाऱ्या गुरूला देऊ शकू असा तिन्ही लोकात दृष्टांतच नाही. द्यायची असेल तर लोखंडाचे सोने करणाऱ्या परिसराची उपमा देऊ शकतो. परंतु ते देखील अपूर्ण आहे. परिस लोखंडाचे सोने बनवतो पण स्वतः सारखा परिस बनवीत नाही. गुरु तर शिष्याला स्वतःचे गुरुत्व देतो आणि म्हणूनच शिष्याला स्वतःच्या प्रति मूर्ती रूपात तयार करणारा गुरु निरूपण आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन