सत्याची सत्ता

 सत्याची सत्ता
कधीही सत्याची सत्ता अमान्य करू नकोस. चुकून सुद्धा प्रमाणिकपणा सोडू नकोस. अप्रामाणिक कधी बनू नकोस. सत्य म्हणजे सत् बोलायचे आणि सत्या साठी काम करायचे. सत्याची सत्ता मानायची.संसारात पडल्यानंतर साहजिकपणे माणूस संसाराच्या भपक्याने त्यात गढला जातो. तो प्रमादी बनतो तेव्हा त्याची सत्ता आहे हे त्याच्या ध्यानात येत नाही. म्हणून आचार्य शिष्याला धोक्याची सूचना देऊन सांगतात की, प्रमाद झटकून टाक आणि दुसऱ्यालाही समजाव की प्रत्येक वस्तूवर प्रभुचीच सत्ता आहे.

ह्या सृष्टीत जे काही दिसते त्या सर्वावर केवळ सत् ची - प्रभूची सत्ता आहे. ही समज मनापासून येईल तरच जीवन विकास होईल आणि जीवनात गती मिळेल; समाजही सुखी आणि स्वस्थ जीवन जगू शकेल.
      ह्या शरीरावर देखील प्रभुचीच सत्ता आहे. ही जाणीव दृढ करण्यासाठी कपाळावर चंदन लावायचे. तशीच गळ्यातली तुळशीची माळ आपल्याला सतत आठवण करून देते की या शरीरावर तुलसी दल ठेवले आहे म्हणजे शरीर कृष्णार्पण झाले आहे; माझे नाही, 'त्याचे' आहे. त्याच्यावर 'त्याची' सत्ता आहे याचे हे प्रतीक आहे.
 
 

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.