स्वाध्याय करताना सर्व काही शक्य आहे
अशक्य काहीच नाही
अनेकांना अशाप्रकारे स्वाध्याय होतो हे शक्य वाटत नाही, अशक्यच वाटते. परंतु 'अशक्य' हा मूर्खांचा शब्दकोशातील शब्द आहे. एकेकाळी आकाशात उडणे अशक्य वाटत होते. तेव्हा देव विमानात बसून जात, असे वर्णन पुराणात ऐकून लोक पुराण कारांवर टीका करत म्हणत असत, 'असे कधी होऊ शकते? गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की नाही? या लोकांना हा नियम काय ठाऊक नाही आणि उगाच काहीतरी फेकाफेक करतात.' पण आज सगळेच आरामात आकाशात उडत आहेत ना!
सामान्यजनांना अनेक गोष्टी अशक्यच वाटतात. परंतु ज्यांना ध्येयनिष्ठ बनुन कार्य करायचा आहे त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. समाजात अशा प्रकारचा स्वाध्याय होईल तर समाजाचा नूरच पलटून जाईल. संपूर्ण समाज स्वाध्याय होईल तर समाज सुखी होईल, समाजात शांती निर्माण होईल.
आपण स्वाध्यायाच्या प्रारंभी आणि शेवटी प्रार्थनेत तीन वेळा शांती: शांती: शांती: असे बोलतो त्यामागे आधीभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक शांति निर्माण होवो अशी भावना आहे. परंतु त्यासाठी शांतीचे बीज पेरले पाहिजे. अशांतीचे बीज पेरून शांती निर्माण होणार नाही. तंबाखू पेरून तांदळाची अपेक्षा ठेवाल तर ते शक्य नाही. समाजात सुख आणि शांती आणायची असेल तर अशी भावना ठेवून स्वाध्याय करण्याची शिकवण देऊन गुरु स्वाध्यायाचे महत्त्व समजतात.
Comments
Post a Comment