कर्मफळ - जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो भगवंत.

 कर्मफळ
     भगवंताने खूप उत्कृष्ट बुद्धी देऊन फर्स्ट क्लास बॅरिस्टर बनवले. तो सर्वांपुढे पटापट युक्तिवाद करतो, पण या जन्मात भगवंताशी संबंध बांधण्याचा त्याने प्रयत्नच केला नसेल तर भगवंत देखील काय करणार? वस्तूत: माणसाला गाढव बनवले कारण माणसाची तशी मागणी होती, तसे त्याचे वर्तन, वागणूक होती. त्याला हवे होते ते त्याला पुढच्या जन्मी दिले.

 खरे सांगायचे तर गाढव मला महान कर्मयोगी वाटतो! कारण तो स्वतःचे खातो आणि दुसऱ्याचे काम करतो. म्हणून त्यावरून गद्येमजुरी हा शब्दप्रयोग वापरला जातो. ही योनीच अशी आहे की तो जीव स्वतःचे म्हणजे जे काही केले आहे ते तो वटवत नाही, त्याचा मोबदला मागत नाही. परंतु माणूस लगेच मोबदला मागतो, गाढव काही मागत नाही. मला तर गाढव जेव्हा दृष्टीस पडते तेव्हा तो पुण्यवान जीव वाटतो. मला तो प्राणी अपशकुनी कधीही वाटत नाही.
 
,cखरं सांगायचे तर गाढव जो त्याग करतो तो सर्व संग्रहित होतो. आपल्या भाषेत सांगायचे म्हणजे त्याची कमाई जमा करून ठेवतो; त्याचे पुण्य गोळा करून ठेवतो . माणसासारखा तो पुण्य खर्च करत नाही.
   


Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन