प्रभूच्या दरबारात न्याय मिळवण्यावरून चाललेली ओढा ओढ

न्याय
 मानवी जीवनाचा अंतिम हेतू प्रभू मध्ये मिसळून जाणे आहे आणि हे मनुष्य योनीतच शक्य आहे. तेव्हा पशु योनीत जन्म घेतल्यानंतर मनुष्य योनीतच जन्म मिळण्याची वाट पाहावी लागते. ज्या जीवाला मनुष्य जन्म मिळाला होता त्याने बुद्धीला स्वच्छ, निर्मळ बनवली नाही म्हणून व्यर्थ गेला, म्हणून तो पशु झाला.
 
शत्रुत्व करतो याचा अर्थ नाश करतो असे नाही. भगवान् परमकारुणिक आहे त्यामुळे तो कुणाचा नाश करणारच नाही.मांजरीचे एखादे पिल्लू दरवाजातून घरात आले तर माणूस त्याच्या मानेला पकडून दूर सोडून येतो त्याप्रमाणे भगवान देखील अशा गणपतरावाला उचलतो आणि त्याला अशा योनीत टाकतो की जिथे त्याला सुख मिळेल आणि तो संसारही करेल.

 माणसाचे मन, बुद्धी शत्रूसारखी बनते. म्हणजे बुद्धी सदिच्छा करणे बंद करते, सत्कार्यापासून विचलित होते आणि फक्त कामना एकत्र गोळा करत बसते. शेखचिल्लीसारखी दिवास्वप्ने रचत राहते.  माणूस मनोरथेच करत राहतो. माणसाच्या बुद्धीची शक्ती क्रियात्मक राहायला हवी तसे होत नाही, आणि मन, बुद्धीवर जे लक्ष दिले पाहिजे ते जेव्हा दिले जात नाही, तेव्हा माणसाचे मन शत्रू सारखे होते असे म्हणण्याचा उद्देश आहे.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन