भक्तीचे वैभव - मी प्रभुचा आहे.

भक्तीचे वैभव
       
जसे 'मी आहे' जे अध्यात्मिक वैभव आहे तसे 'मी प्रभूचा आहे' हे भक्तीचे वैभव जीवनात उतरवले पाहिजे. केवळ बोलणे आणि त्या आचरणात आणणे ह्या दोहात खूप फरक आहे. 'माझे सर्वस्व भगवंत आहे आणि हा देह भगवंताचा आहे. प्रभुने त्याला हवा तसा तो वापरावा.' ही समाजाच्या जीवनात दृढ झाली आहे त्याच्याकडे भक्तीचे वैभव आहे. आणि जे लोक असे जीवन जगतात त्यांचे जीवन फक्कड असते.
        
तुकाराम महाराजांचे जीवन फक्कड होते. आता उरलो उपकारापुरता| भगवंतावर उपकार कणाऱ्याचे जीवन केवढे भव्य जीवन असेल! यांच्यासारख्या जीवनाला वेगळा सुगंध लागत नाही. जीवनाला अत्तर लावून सुगंध येत नाही. आमुकेक प्रकारचे जीवन जगण्यात सुगंध आहे. अशी जीवने जगणाऱ्या ऋषींना अत्रिं तर्पयामि| वशिष्ठं तर्पयामि| म्हणून त्यांचे तर्पण करतात. आणि ज्यांच्या जीवनात थोडी बहुत का होईना बुद्धी आहे त्यांना अशा लोकांच्या जीवनाचा सुगंध येतोच येतो. परंतु ज्यांच्या नाकात क्षुद्र भौतिक वादाची तपकीरच भरली आहे त्या लोकांना अशा दैवी जीवनाचा सुवास कुठून येणार?
 

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.