जीवनात वैभव कशाचे असावे ?

 भूत्य न प्रमदितव्याम्|
 
भूत म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्य वाढवण्यासाठी, वैभव वाढवण्यासाठी माणसाने प्रमाद करता कामा नये. वैभव वाढवायचं म्हणजे कोणते वैभव वाढवायचे? पैशाचे वैभव, बुद्धीचे वैभव की लोक मान देतील, हार घालतील ते प्रतिष्ठेचे वैभव? वस्तूत: हे जीवनाचे वैभव नाही. बँकेच्या खात्यात पाच लाख रुपये पडले असतील त्याचा जीवनाच्या वैभवाशी काय संबंध?
       
जीवनाचे वैभव म्हणजे,
 (१) 'मी आहे' चे आध्यात्मिक वैभव
 (२) मी वैभव 'मी प्रभुचा आहे' हे भक्तीचे वैभव आणि   (३) 'मी कोणत्यातरी निश्चित ध्येयाच आहे' हे दैवी वैभव. 

ही तीन वैभवी जीवनात मिळून वैभव संपन्न बनायचा आचार्यांचा आदेश आहे. ज्यांच्या जीवनात हे वैभव दिसत नाही त्यांचे जीवन फुकट गेले- अशा लोकांसाठी भगवंताने गीतेत म्हटले आहे- मोघं पार्थ स: जीवती|
   

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.