प्रभूला आनंद होईल असे आपले वर्तन असावे.

प्रभूला आनंद होईल.
      हा जन्म म्हणजे केवळ हे जीवन, असे जीवनाचे लक्ष नाही. मुक्ती हे जीवनाचे लक्ष आहे. आपल्या देशात नाटके लिहिली आहे त्याच्यात शोकांतिका मुळीच नाहीत. त्याचे कारण स्पष्ट आहे की आपण ट्रॅझडी मानत नाहीत. जीव प्रभू पासून निघाला आहे आणि शेवटी तो प्रभु पाशी जाणार आहे. कोणी व्यक्ती मरण पावते आणि त्याला मशानात आग्नी दिला की त्याचे जीवन समाप्त होत नाही. तिथे नाटकाचा एक अंक पुरा झाला आणि दुसऱ्या अंकाची सुरुवात झाली. प्रभूच्या मांडीवर पोचणे म्हणजे नाटकाचा अंत झाला असे मानतात. म्हणून आपण जीवनाचा अंत वाईट आहे असे मानतच नाही. हा जीव प्रभू पासून वेगळा झाला आहे आणि शेवटी तो प्रभूत मिसळून जाणार आहे, तेव्हा त्याचा अंत झाला असे मानतात.
        
म्हणून ह्या जन्मात चांगली स्थिती प्राप्त झाली, चांगली बुद्धी मिळाली, पैसा मिळाला तेव्हा असे काम करा की भगवंताला असे वाटले पाहिजे की या मुलाला याहून अधिक दिले पाहिजे. जीवनाच्या या कारणांना न विसरता असे काम करा की प्रभूला आनंद होईल.
     
 इहलोक, परलोक आणि या जन्मातील स्वतःची कुशलता मिळून आणि पुढील जन्माच्या कुशलतेची तयारी बाळगून जे जीवन जगतात ते खरं जीवन जगले असे म्हणू शकतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन