जन्मांतराचे कुशलता जगण्यात असली पाहिजे.


 कुशलता
माणूस स्वतःच्या पैशाच्या मस्तीत किंवा प्रतिष्ठा आणि सत्तेच्या मस्तीत किंवा केवळ भौतिक सुखातच रममान होतो त्यामुळे त्याला जीवनात समाधान मिळत नाही. मरताना त्याचे मन त्याला डंक मारते. 'ह्या जीवनात मी भगवंताचे काम केले नाही' म्हणून त्याला मरतेवेळी देखील त्रास होतो आणि येणाऱ्या जन्मात सुद्धा त्रासच होणार. याला काय कुशलता म्हणावी?
      
माणसाने ह्या जन्मीचे आणि मेल्यानंतर येणाऱ्या पुढील जन्माचे कुशल पाहायला हवे. गेल्या जन्मीच्या कर्मामुळे या जन्मात तुला कुशलता मिळाली आहे. ते कुशल येत्या जन्मी ही मिळेल असा पुरुषार्थ करायला माणसाने विसरता कामा नये. जीवनात दैवाला देखील स्थान आहे. हे माणसाने लक्षात ठेवून जीवनव्यहार केला पाहिजे.
      
वैयक्तिक जीवनात तर दैवाचे महत्त्व आहेच पण ऐतिहासिक दृष्टीने देखील विचार केला तर अशा कित्येक घटना आहेत की जिथे हे पाचवे कारण आहेच असे मानावे लागते; पण जे आजचे इतिहासकार मानायला तयार नाहीत. त्यात त्यांना कमीपणा वाटतो. त्यासाठी ते केवढी मेहनत करतात पण त्या प्रसंगाचे कारण समजावू शकत नाहीत.
         
कर्माच्या सिद्धांताप्रमाणे व्यक्तीला त्यांचे फळ मिळते. एक वैश्विक शक्ती हे सगळं पाहत आहे. माणसाला गत जन्माचे परिणाम भोगावे लागतातच. तर ह्या जन्मात असे काम करून पुढील जन्म सुधारेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जन्मांतराचे कुशल पाहणे हे देखील कुशलान्न प्रमदितव्याम् होय.
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन