सद्गुरु

सद्गुरू 

भारतात गुरुपरंपरा होते‌. 'मी कोणाचा तरी आहे' हा मधुर भाव त्यात आहे. ह्या भावनेत कृतज्ञता येते. जनकाचे गुरु यात ज्ञान होते. आणि शुकाचार्याचे गुरु जनक होते. सांदिपनीचा शिष्य म्हणून घेण्यात कृष्ण व सुदामा गौरव मानत होते. विश्वामित्राची सेवा करण्यामध्ये राम व लक्ष्मण कधी थकत नव्हते. वेद, उपमन्यू किंवा अरुणी यांना धौम्य ऋषी गुरु लाभले याबद्दल ते स्वतःला धन्य समजत होते. द्रोणाबद्दल अर्जुनाच्या मनात असलेला नाजूक भावच त्याला युद्ध करतानी थोडा शिथिल बनवतो. परशुरामापासून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कारणाने खूप कष्ट घेतले. शुक्राचार्य पासून संजीवनी विद्या प्राप्त करणाऱ्या कचाची ज्ञाननिष्ठा व गुरुभक्ती आजही आपल्याला नतमस्तक बनवते. गौड पादाचार्यांचे नाव येताच शंकराचार्य भावविभोर होत असत. पाश्चात देशात ही मी अमक्याचा शिष्य आहे असे मानन्यता धन्यता अनुभवतात. 

भारतीय संस्कृतीने गुरूमध्ये कळस रूप अशा सद्गुरूला नेहमी पुजले आहे. गुरु विश्वाच्या अनंततेचे तसेच सृष्टीच्या ज्ञानाचे दर्शन करतो. परंतु सद्गुरु जीवनाची कला शिकून मानवाला ईश्वरा विमुख बनवतो. अध्यात्म विद्याचे दर्शन करणारा सद्गुरू आहे. जीवनाला सुंदर निर्दोष व पवित्र बनून आपला हात पकडून प्रभू चरणा जवळ आपल्याला घेऊन जाणारा हा सद्गुरु आहे. आजच्या दिवशी अशा सद्गुरूची पूजा करायची.

'ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति| द्वंद्वातीत गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ||
 एकं नित्यं विमलमचलं सर्वाधीसाक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि||'
      'ब्रम्हाचा आनंदरूप, परमसुखरूप, ज्ञानमूर्ती,
      द्वंव्दापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म,            तत्त्वमसी, तोच तो आहेस हे ईश तत्व तूच आहेस त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही भावाच्या पलीकडे, त्रिगुणरहित अशा सद्गुरुला मी नमस्कार करतो.'
    
ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल अशा गुरुचे ह्या दिवशी पूजन करायचे असते. गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन. गुरु पूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन. गुरु पूजन म्हणजे अनुभवांचे पूजन. परंतु ह्या काळात असा सद्गुरु मिळाला नाही तर? 'कृष्ण वंदे जगद्गुरुम्' भगवान कृष्णाला गुरु बनवून त्याने दाखविलेल्या जीवनपंथावरून चालणे हेच श्रेयस्कर आहे.
   
कृष्णाचा गीता संदेश वाचून, समजून, त्याच्यावर विचार करून व आचरणात आणून घराघरात घेऊन जायचा संकल्प करायचा. गावागावात या जगद्गुरुची आश्वासने पोहोचून झोपलेल्यांना जागृत करायचं व मेलेल्यांना संजीवनी पाजायची. ज्याने भारतीय संस्कृतीच्या वृक्षाला स्वतःच्या रक्तनाने वाढवले आहे, पोचले आहे अशा जगद्गुरु चे आपणावर फार मोठे ऋण आहे. या ऋणाचा विचार करून कृतज्ञ भावाने त्याचे कार्य करण्यासाठी कटीबद्ध होणारच गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी करतो. गीतेच्या ज्योतीने झोपडी झोपडी प्रकाशित करणाराच श्रीकृष्णाचा खरा उपासक आहे. त्यानेच गुरुपौर्णिमेचा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला आहे; बाकीच्याने नाही, असे दृढतेने सांगता येते.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन