आत्मनिरीक्षण
आत्मनिरीक्षण
जसी प्रभूकार्यात, सत् च्या कामात चूक करायची नाही त्याचप्रमाणे सत् ची सत्ता मान्य करण्यात देखील चूक नाही करायची. प्रत्येक वस्तूवर त्याचीच सत्ता आहे, ही समज पक्की करायची.पुष्कळ लोक घराला 'ईश्वर भवन' असे नाव देतात. पण घर मात्र ईश्वराचे न समजता स्वतःचेच समजतात फक्त नावाने ते ईश्वराचे असते. घरावर नाव लिहितात 'लक्ष्मी सदन,' पण ते विष्णू पत्नी लक्ष्मीचे नसतेच.
आपण अशा प्रकारे भगवंताचे नाव वटवून खातो आणि आत्मवंचनेत राहतो की आपण सगळे भगवंताची सत् ची सत्ता मानतो! आचार्य निरोप देताना शिष्याला सांगतात: सत्यान्न प्रमदितव्यम | सगळीकडे भगवंताची सत्ता आहे हे कधीही विसरू नकोस, ते विसरलास तर जीवन संपेल.
Comments
Post a Comment