शत्रुत्व - मन आणि बुद्धी यांच्यात चाललेला वाद.
शत्रुत्व
जी व्यक्ती बुद्धीला शुद्ध करायचा प्रयत्न करत नाही, ज्याने मनाला जिंकलेले नाही तो स्वतःच स्वतःचा शत्रु बनतो. परिणामी माणसाचा विकास थांबतो. मनुष्य योनीमध्ये जीवाने जो विकास साधला होता, म्हणजे विकास साधता साधता जीवाने प्रभू पर्यंत पोहोचण्याचे जे अंतर तोडलेले असते, जिव वर चढलेला असतो तो घसरून खाली येतो. असे जे जीवाचे अधिपतन होते ते शत्रुत्व. हे बरोबर समजून घेतले पाहिजे.
भगवंत जीवाला दुःख देतो, त्यावेळी देखील भगवान जीवाच्या सोबतच असतो यात शंकाच नाही. परंतु गाढवाच्या योनीत दुःख आहे की नाही त्याची शंकाच आहे. गाढवाला मालक फटका मारतो त्यावेळी गाढवाला दुःख होतेच असे मानण्याचे कारण नाही. आपली बुद्धी संवेदनशील आहे. तेव्हा आपले कोणी स्वागत केले नाही किंवा कोणी शिवी दिली तर अपमान वाटतो. असे घडते की देव अधिक दुःख देतो तेव्हा त्याप्रमाणे तो आपल्याला सहन करण्याची शक्ती देखील देतो.
Comments
Post a Comment