सत्यान्न प्रमदितव्यम्|
सत्यान्न प्रमदितव्यम्|
गीतेला मानणारे अनेक लोक म्हणतात की गीतेचे काम करणारे तर पुष्कळजण आहेत. त्यांना विचारले पाहिजे की मग तू काय हुक्का पीत बसणार आहेस? भगवंताने तुला सोन्यासारखा देह दिला आणि तो तू पितळेचा करून टाकलास! ऋषी सांगतात, 'तू सोन्याचा आहेस. उपनिषद ऐकतो तोपर्यंत वाटते की आपण सोन्यासारखेच आहोत.' परंतु ते बंद झाल्यावर वाटते की, 'मी कोण? मी कोण्या झाडाचा पाला?'
तुझ्या घरचे काम तू करतोस तसा तुझ्या अंतकरणात आग्रह हवा की, गीता ही सत् आहे, प्रभूची आहे म्हणून तिचा प्रचार मलाच करायचा आहे? असा आग्रह असेल तरच तुम्ही गीतेचे पुत्र, रामाचे पुत्र, कृष्णाचे पुत्र!
सत् चे काम करणे म्हणजे सत्य काम, त्यात चूक चालणार नाही. बँकेत हिशोब करताना एखादी चूक झाली तर एक वेळ चालेल, मात्र जीवनाचा हिशोब करताना चूक होताच कामा नये, याचा आग्रह असला पाहिजे. नवे वर्ष सुरू होणार आहे तेव्हा जीवनाचा आढावा घे की गेल्यावर्षी मी प्रभु चे काही काम केले काय किंवा त्यात प्रमाद केला? ज्या हाताने प्रभूला फुल वाहिले ते हात प्रभू कार्य करू लागले आहेत काय?
Comments
Post a Comment