सृष्टीवर सत्ता कोणाची ?
सत्ता कोणाची?
विचार केल्यावर एक सहज एकच प्रश्न उभा राहतो की या जगावर सत्ता कोणाची?अख्ख्या जगात सगळीकडेच सत्तेसाठी भांडणे चालू आहेत. लोकल बोर्डात, म्युनिसिपालटीत, पार्लमेंटमध्ये सगळीकडेच सत्तेसाठी साठमारी चालू आहे. दहा बाय दहा च्या खोलीवर पण सत्ता कोणाची? सासूची की सुनेची? मोठ्या जावेचे की छोट्या जावेची? सासूला वाटते की, मी इथे या घरात काळ्याचे पांढरे केले आहेत तेव्हा सत्ता माझी आहे. आणि सुनेला वाटते की, तुम्ही भले काळ्याचे पांढरे केले असतील पण तुमचे दिवस आता गेले. आता तर 'आमचे हे' कमावतात तेव्हा सत्ता माझी आहे. ही सत्ता प्रभूचीच आहे ही समज अंगी बानली तर ही सगळी भांडणेच कमी होऊन जातील.
सत्य केवळ भगवंत आहे आणि सर्वावरच त्याची सत्ता चालते, ही भावना दृढ होणे आवश्यक आहे. सत्य म्हणजे सत् ला अनुसरून बोलणे, सत् चे काम करणे आणि सत् ची सत्ता मान्य करणे. त्यात उतू मातू नकोस, आळस करू नकोस. माणसाला प्रभू कार्यातच प्रमाद येतो. आणि माणूस त्याचे समर्थन करताना म्हणतो, 'हे तर प्रभु चे काम आहे, सगळे 'तोच' करतो.' म्हणूनच उपनिषद् म्हणते की सत्यान्न प्रमदीतव्यम्|
Comments
Post a Comment