भगवंत भेटीची साक्षात अनुभूती

 
अनुभूती

भगवान या जगात आहे, तो तुला सांभाळतो आहे, कारण तू त्याचा मुलगा आहेस. हे सगळे आपण प्रवचनातून ऐकतो. गीतेत आणि उपनिषदात वाचतो. समजून घेतो पण समजणे वेगळे आणि अनुभवणे वेगळे. कोणत्याही गोष्टीची समज प्रथम हवीच. सामान्य खाण्याच्या गोष्टी घ्या ना. त्या पदार्थाची समज घेतली पाहिजे पण तितके पुरेशी नाही. याची अनुभूती घेतली तर कळते की तो पदार्थ कसा होता. राज महालाची वाखणणी ऐकून राजाला संतोष होत नाही आणि भोजनाचे वर्णन वाचून भूक शांत होत नाही. त्याचप्रमाणे भक्ती केवळ ज्ञानाने साधत नाही.

त्याचप्रमाणे ज्याने बुद्धीने मनाला जिंकले आहे त्याच्यासोबत प्रभू सबंध बांधतो. बुद्धी स्वच्छ, निर्मळ बनली तरच मनाला जिंकता येते. बुद्धीने मनाला जिंकायचे म्हणजे मनाला माहीत झाले पाहिजे की या शरीरात त्याला कशा प्रकारे राहायचे आहे.
 

Comments