नात्मानमवसादयेत - स्वतःला हलके घेऊ नका.
नात्मानमवसादयेत
अध्यात्मात माणसाची तशी वृत्ती नसते, याला कारण त्याचा प्रमद आहे. गीतेत भगवंताने सांगितले आहे प्रमादालस्यनिद्राभि: तन्निबध्नाति भारत | प्रमाद, आळस आणि निद्रा हे तीन तमोगून आहेत आणि भगवान् सत्वगुणाधिष्ठित आहे. म्हणून मनाला भगवंताकडे न्यायचे असेल तर तमोगुण सोडला पाहिजे.
माणसाची दुसरी एक दुर्बलता आहे, तो स्वतःला हलका समजतो. 'अध्यात्म वगैरे माझ्या अवाक्यातले नाही. मी कोण? कोण्या झाडाचा पाला? हे सर्व मी कुठून करू शकणार? हे सर्व मला नाही साधणार,' ही माणसाच्या मनाची दुर्बलता आहे. म्हणून भगवंताने या श्लोकात म्हटले आहे, नात्मानमवसादयेत | स्वतःला हलका समजू नकोस. तुला स्वतःच स्वतःचा उद्धार करायचा आहे. माणसाला सतत असे वाटते की माझ्याच्याने आमके होणार नाही. पण प्रत्यक्षात तसे नसते. खरी समज नसल्यामुळे त्याला तसे वाटते.
जुन्या काळी पाच - सात वर्षाच्या मुलीचे लग्न करण्यात येत असे. मुलीची आई तिच्यासमोर तिच्या पतीचे भरपूर वर्णन करत असे. पण तेव्हा त्या मुलीला तिच्या पतीचे आकर्षण वाटतच नसे. परंतु ती तरुण होताच तिला पतीचे आकर्षण निर्माण होई. पती म्हणजे काय याची समज तीला तेव्हा येई. आणि म्हणूनच मग सासरी जाण्यात तिला आनंद होई. असाच एक दृष्टिकोन तयार झाला पाहिजे आणि तो व्यक्तीने स्वतः जोपासायचा असतो.
Comments
Post a Comment