भगवान श्रीकृष्णाची एकतर्फी भूमिका

 
सत्य
       कंसाबद्दलही भगवान श्रीकृष्णाचे स्पष्ट भूमिका होती की कंस माझा मामा आहे की नाही ते मी जाणत नाही. मला एवढेच माहित आहे की जो संस्कृतीचे काम करतो तो माझा. स्वतःच्या मामाला किंवा काकालाही आपला न मानण्यासाठी मन केवढे खंबीर असायला हवे!
      जसे जीवनात ऋत असले पाहिजे तसे जीवन विकासासाठी दुसरा एक अलौकिक तत्व श्रुती समजावते आणि ते म्हणजे सत्य.
      सत्यं म्हणजे सत्य हिते सत्यं| माणसाला असत् च्या मोहापेक्षा सत् च्या आनंदाची कल्पना किंवा दिव्यता कळली पाहिजे.
       भगवान् जो सत्य आहे त्याला पकडण्यासाठी माणूस धावत नाही. पण असत् च्या पाठीमागे मात्र तो धावत असतो. तो भगवंतापाशी जातो तेव्हा सुद्धा जे असत् आहे, नाशिवंत आहे ते मागण्यासाठी जातो.
        हे सर्व असत् आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी सत् ची उपासना, प्रभूची उपासना चालते. परंतु सत् साठी सत् ची उपासना केव्हा होऊ शकेल? जेव्हा सत् वर प्रेम निर्माण होईल तेव्हा. सत् वर प्रभूवर प्रेम निर्माण होईल तेव्हा. 
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन