प्रत्येक मानवाने आपल्या तेजस्विता कशी आणावी ?
तपस्वी पाहिजे
जीवणात तप हे आसले पाहिजे. तप म्हणजे निश्चित ध्येयासाठी झिजणे, पण माणसाचे हे करण्याची तयारी नाही आणि स्वतः काही तप केले आहे असे खोटे समाधान मात्र हवे आहे. तप तर तेव्हा म्हणायचं की जे ध्येय निश्चित केल्यावर त्यासाठी उडी घेण्याचीही निष्ठा असेल.
भगवंतापाशी जाण्यासाठी तप केलेच पाहिजे. परमार्थ मागायचा असतो आणि व्यवहार करायचा असतो. जर परमार्थ मागायचा असेल तर भगवंताच्या दरबारात आपल्याला कदाचित भिकारी होऊनच जावे लागणार!
जेव्हा जेव्हा समाजातून स्वाध्यायाचे तत्व खलास होते, तेव्हा समाज दुबळा, लाचार होतो. समाजात दिव्यता, प्रेम, तेजस्वीता, आत्मीयता टिकत नाही. समाज कृतघ्नी बनतो. त्याचे प्रभूवर खरे प्रेम उरत नाही. समाज निकृष्ट दशेत जगतो. कदाचित तो आर्थिक दृष्ट्या समृद्ध होतही असेल पण भोग जीवनात रमणारा समाज पशुतुल्यच होत जातो. म्हणुनच आपल्याला तेजस्विता टिकवायची असेल तर स्वाध्याय आचरणात आणला पाहिजे. जेव्हा असे होते तेव्हा भगवान अवतार घेतो.
👌👌
ReplyDelete