दुर्योधन आणि श्रीकृष्ण यांच्यातील संवाद.
तेच माझे
भगवान श्रीकृष्णाने म्हटले, 'ज्या संस्कृतीसाठी आम्ही जगतो आहोत, रात्रंदिवस त्यासाठी काम करत आहोत ती संस्कृती तुला नको आहे'.
या उलट पांडव मात्र रात्रंदिवस एकच स्वप्न उराशी बाळगून आहेत की, भारतीय संस्कृती जी दैवी आहे, ती उन्नत कशी होईल. त्याशिवाय दुसरा विचारच ते करत नाहीत. म्हणून ते माझे आहेत. माझ्या कार्यात, संस्कृतीच्या कार्यात जे माझ्या पद्धतीने उभे राहत नाहीत ते माझे नाहीत. तुला संस्कृतीचे काम करायचे नाही तसा केवळ देखावाच करायचा आहे. ही तुझी लबाडी आहे. तुझ्या भोवताली तुझे स्तुतीपाठक , खुशामतखोर जमा झालेले आहेत, त्यांच्या सल्ल्याने तू चालतोस. तुला भगवान् नको आहे. नीती, संस्कृती नको आहे जगाला दाखवण्यासाठी तू थोडीबहुत कामे करत असशील पण संस्कृतीच्या कामासाठी तुझे आतडे तुटत नाही. तुझे माझ्यावर प्रेम नाही आणि माझे तुझ्यावर प्रेम नाही म्हणून मी तुझ्याकडे जेवायला येणार नाही.'
भगवान श्रीकृष्णाचे असे सणसणीत वक्तव्य ऐकून दुर्योधन चिडला आणि श्रीकृष्णाला बांधायला निघाला.
Comments
Post a Comment