मुलीचे आपल्या वडिलांस सेवानिवृत्ती प्रसंगी लिहिलेले पत्र.
आज या खास प्रसंगी माझ्या वडिलांचा सेवानिवृत्तीच्या सोहळ्यात तुमच्यापुढे बोलताना मला अत्यंत अभिमान आणि सन्मान वाटतो.
पप्पा, तुमच्या विचारांनी, तुमच्या कार्याने आणि तुमच्या मायेने आमच्या जीवनाला जो प्रकाश मिळाला आहे. त्याचे वर्णन हे शब्दात करणं खूप कठीण आहे. तुमचे काम नेहमीच उत्कृष्ट साठी प्रसिद्ध राहिले आहे आणि आज आपण केवळ तुमच्या सेवानिवृत्तीच्या नाही तर तुमच्या कार्याच्या मेहनतीचा आणि योगदानाचा देखील उत्सव साजरा करत आहोत. तुम्ही नेहमीच कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक माझ्याकडे राहिले आहात. तुमच्या व्यवसायिक आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्ही जे कौशल्य, नेतृत्व आणि मार्गदर्शन मला दिले यातून मला नेहमी एक वेगळी प्रेरणा मिळत गेली.
पण यातून पुढे जाऊन मला आवर्जून सांगावं वाटतं की, तुमच्या व्यवसायिक यशापेक्षा, तुमचे वैयक्तिक यश मला खूप जास्त महत्त्वाचं वाटतात, कारण तुमच्यात असलेली दयाळूता, उदारता, प्रेमळता, संयमपणा, शांत स्वभाव आणि विनोद बुद्धी हे माझ्या जीवनात प्रकाश पूज्य आहेत. पप्पा तुमच्याकडून मी करुणा, नम्रता आणि शांततेचे मूल्य शिकले आहे. पप्पा आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहे म्हणजे हा एक शेवट नसून दुसऱ्या प्रवासाची नवी सुरुवात आहे.आता येणारी वेळ ही तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींचा शोध घेण्याची, कुटुंब, मित्रमंडळी यांसोबत वेळ घालवण्याची आणि तुम्ही आतापर्यंत केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ उपभोग न्यायासाठी आहे. म्हणून आता येणाऱ्या वेळेचा वापर पूर्णपणे यासाठी करावा.
माझ्या पप्पांबद्दल सांगायचं झालं तर त्यांना वाचण्याची एवढी आवड आहे की बस त्यांचा गीतेवर सतत सतत काहीतरी अभ्यास हा चालूच असतो गीता तर कितीदा वाचून झाली आहे. जोपर्यंत मला गीतेचा एक एक शब्द कळत नाही तोपर्यंत ते वाचताच रहातात.
रोजच्या दैनंदिनित असा एकही मिनिट पप्पांना भेटणार नाही की तो व्यर्थ चालू आहे जसा वेळ भेटेल तसे लगेच अपली आवड ते जोपासत आसतात. प्रत्येक ठिकाणी पुस्तक सोबात ठेवणं शक्य नसतं तर पप्पा फोटो काढून घेतात मोबाईल मध्ये मग कधीही, कुठेही वाचू शकतात करण आवड हि आवड असते ना.
Generally युवा पिढी सोबत आम्हीही करिअर करत वेगाने धावण्याचा प्रयत्न करत होतो पण धावता धावता मध्ये जेव्हा आणखी एक "आई" नावाचं नातं जोडलं गेलं तेव्हा कोठेतरी तू थांब आणि हे नातं आधी खूप मेहनतीने पार पाड आणि मग तू परत तुझ्या प्रवाहासोबत जा हे असे सांगणारे माझे पप्पा होते.
पप्पांबद्दल सांगायचं झालं तर बरच खूप अवघड आहे. या व्यक्तीसोबत असणं म्हणजे असं जग की, त्या जगात कशाची उणीव नाही. कधी कोणती गोष्ट मागितली आणि त्यासाठी माझे पप्पा मला नाही म्हटले,असे एकदाही झालं नाही. तसेच कधी एखादा प्रश्न विचारला आणि तर त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा कधी मला अनुभवच आला नाही.
पप्पांची जास्त attachment ही स्वाध्याय परिवाराशी आहे.जेव्हा मी 4 वर्षांपूर्वी या घरात आले तेव्हा पुढे कसं होणार हा प्रश्न मनाच्या एका छोट्या कोपऱ्यात होतात, पण जेव्हा मी घरात रुळत गेली तेव्हा कळलं की या घरात भगवद्गीतेचे स्थान काय आहे ते मी स्वतः प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात शिकलेली OM SHANTI परिवारातून आलेली. मग मला इथं सगळ्यांशी जमून घेणं काही अवघड गेलं नाही.
"जसं सूर्य बोलत नाही तरीही त्याचा प्रकाश त्याचा परिचय देत असतो, तसेच तुमची शिकवण ही नेहमीच आम्हाला प्रवासाच्या वाटा दाखवत असते".
जीवनात यशस्वी होणे हे प्रत्येकाच्या पदरात असतेच असं नाही,
पण प्रयत्नवादी व्यक्ती कधी अयशस्वी होतच नाही, हेही तितकच खरं.
म्हणूनच म्हटले जाते की,
"गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी,
सूर्याकडून तेच घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी,
आणि आमच्या पप्पांकडून शांतता घ्यावी आलेल्या
संकटावर मात करण्यासाठी!"
आजच्या कलियुगात असं म्हटलं जातं की माणसाने सोन्यासारखं असावं,पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे की खरंच माणसाने सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हे गळ्यात, हातात, तिजोरीत राहतं.शोभेची वस्तूच काम करतं.आणि त्यातून आपल्यात फक्त भौतिक सुख मिळत. म्हणूनच माणसाने व्हायचं असेल त "परिस" व्हावे.ज्याच्या संगतीत जाईल त्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच आमचे पप्पा आहे जेथे जातील तिथे अध्यात्म सांगितल्याशिवाय राहत नाहीत.
जाता जाता एवढेच सांगते,
जे जे हवे आहे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळू दे,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखं घडू दे.
शेवटी मला एक कविता सादर करावी वाटते तुमच्या समोर जे मी काही लिहिलेली नाही पण मला आवडली आणि ती माझ्या वडिलांना अगदी सूट होणारी वाटली म्हणून मी मांडते,
माझा बाप
माझा बाप, माझा आदर्श,
त्याच्यावर निखळ श्रद्धा,
त्याच्या कष्टाचा मोल,
कधीच होत नाही कमी.
रात्रंदिवस मेहनत करतो,
घरासाठी झटतो अहोरात्र,
त्याच्या डोळ्यांत स्वप्नं लपलेली,
माझ्या उज्ज्वल भविष्याची.
न बोलता शिकवतो ज्ञान,
त्याच्या प्रत्येक कृतीतून,
त्याच्या प्रेमाची ओलावा,
सारे जगतेच जाणते.
त्याचे हसू माझे हसणे,
त्याचे दु:ख माझे दु:ख,
त्याच्या संगतीत सापडते मला,
जीवनाची खरी दिशा.
कृतज्ञतेच्या शब्दांत,
व्यक्त करतो प्रेम,
माझ्या बापाला वंदन,
माझ्या हृदयाच्या कोपर्यातून.
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या आणि वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा, आता ही नवीन यात्रा आनंदाने, स्वास्थ्याने आणि उत्तम आठवणींनी भरलेली असो.
Thank you so much.
👌
ReplyDeleteVheri Nais
ReplyDeleteMast
ReplyDelete