श्रीकृष्ण ऋत होता
श्रीकृष्ण ऋत होता
भगवान श्रीकृष्ण ऋत होता, म्हणून पूज्य आहे. त्याच्या डोक्यात संस्कृतीचे जे काही काम नक्की झाले होते ते त्यांनी दिवस-रात्र केले. त्यांनी गणराज्य मिळवले ते सुद्धा संस्कृतीच्या कामासाठी आणि बहीण सुभद्रा हीचा विवाह अर्जुनाशी करून देण्यातही हीच भूमिका होती. त्याला माहीत होते की पांडव संस्कृतीचे काम करतील. त्यासाठी त्यांना पुष्कळ संपत्तीही लागेल. पांडव खरे क्षत्रिय असल्याने कृष्णाने अशीच देऊ केलेली संपत्ती त्यांनी स्वीकारली नसती म्हणून सुभद्राचे अर्जुनाशी लग्न लावून अब्जावधी रुपये सुभद्रेची पाठवणी करतेवेळी दिले.
आज दुबळे, लाचार, दिन वृत्तीचे लोक 'माझा कृष्ण' म्हणतात, पण त्यांना कृष्णाचे तेज पचत नाही. तो पूर्ण अवतार होता आणि त्याला हे निश्चित माहीत होते की माझा कोण आहेत आणि कोण नाहीत. संस्कृतीसाठी कोणाचे आतडे तुटतें याची ही त्याला जाण नव्हती असे नाही. पांडव जसे त्याचा आदर सत्कार करत असत तसे कौरवही त्याचा आदर सत्कार करत असत.
महाभारत व्यवस्थित वाचले तर समजेल की दुर्योधनाची राज्यव्यवस्था किती सुंदर होती! तो तर सांगत असे की धार्मिक विकास झाला पाहिजे. धार्मिक शिक्षण दिले पाहिजे. त्याशिवाय समाजाला सुखी करता येणार नाही. मात्र त्याला आणि त्याच्या अवतीभवती फिरणाऱ्या स्वार्थी लोकांनाही संस्कृतीचे काही पडलेले नव्हते. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला आणि त्याच्याबरोबर फिरणाऱ्या मंडळींना चांगला ओळखून होता आणि तो समजून चुकला होता की दुर्योधनादी कुणीही संस्कृतीचे काम करणार नाहीत, तरीही त्यांच्याशी त्याचे संबंध बिघडले नव्हते.

Comments
Post a Comment