गुरूपूजन - गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: | गुरु: साक्षात परब्रम्ह: तस्मै श्रीगुरवे नमः ||



गुरूपूजन 
         भगवान श्रीकृष्णाला जगद्गुरु म्हणण्याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की गीतेमध्ये त्याने भरपूर आश्वासने दिली आहेत. म्हणून तो मला अधिक प्रिय आहे. ब्रह्मसूत्र शारीरिकभाष्य, उपनिषदे  इत्यादीमध्ये श्रेष्ठ तत्वज्ञान आहे, खण्डखण्डखाद्य देखील तत्त्वज्ञाने ठासून भरलेले आहे आणि आपण ते वाचायला बसलो तर मस्तक चक्रावून जाते. पण गीतेचा परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् ...हा श्लोक वाचतो तेव्हा आपल्याला आश्वासन मिळते. गुरु जसे आश्वासन देतो तसाच जीवनात येणारी भयस्थाने- खड्डे समजावून सावध करत सांगतो, 'पुढे बघ, सांभाळ, जपून पाऊल टाक.'
         तुम्ही प्रभुचे काम करू लागलात की तुम्हाला धंद्यात नफा होईल, भरपूर पैसा मिळेल आणि नंतर तुम्ही ढिले पडाल. वेळ नाही असे सांगून कार्यातून बाजूला व्हाल. अशा भयस्थानाकडे लक्ष वेधून गुरू लाल कंदील दाखवतो.
        मनात निर्माण होणारा कचरा कुठे फेकायचा याची समज गुरु देतो. हे त्याचे पाचवे कार्य आहे. गुरुपाशी कचरा टाकला तरी त्याच्या मनातून तुम्ही उतरणार नाहीत. या पाच कारणामुळे गुरुसंस्थेची परमार्थात अत्यंत आवश्यकता आहे.
        म्हणूनच तर गुरुला, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: | गुरु: साक्षात परब्रम्ह: तस्मै श्रीगुरवे नमः || म्हणून त्याचें पूजन करायचे.
  

  

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन