सत्यं शिवं सुंदरम
सत्यं शिवं सुंदरम
पुष्कळ लोक घराला 'ईश्वर भवन' असे नाव देतात. पण घर मात्र ईश्वराचे न समजता स्वतःचेच समजतात. घरावर नाव लिहितात 'लक्ष्मी सदन,' पण ते विष्णू पत्नी लक्ष्मीचे नसतेच.
आपण अशा प्रकारे भगवंताचे नाव वटवून खातो आणि आत्मवंचनेत राहतो की आपण सगळे भगवंताची सत् ची सत्ता मानतो! आचार्य निरोप देताना शिष्याला सांगतात: सत्यान्न प्रमदितव्यम | सगळीकडे भगवंताची सत्ता आहे हे कधीही विसरू नकोस, ते विसरलास तर जीवन संपेल.
सत् वरून सत्य शब्दाची उत्पत्ती झाली आहे आणि जगात सत्य - खरा केवळ भगवानच आहे बाकी सर्व असत् म्हणजे खोटे आहेत. बाकी सर्व सतत बदलत राहिलेले आहे. दोन पायाचा चार पाया वाला ही होतो. स्त्रीचा पुरुष होतो आणि पुरुषाची स्री होते. कोणाला माहित कोण कसा बदलेल. मात्र सारे काही बदलणारे आहे. त्यात सत्य फक्त भगवानदच आहे, त्याच्यात बदल होत नाही, ही समज दूर करण्यासाठी स्वाध्याय आ9हे. भगवंतावर प्रेम वाढवायचा असेल तर स्वाध्याय हे एकाच औषध आहे.
सर्व रोगांवर स्वाध्याय हे एकच औषध आहे. ते घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर, गीतेच्या शब्दात सांगायचे तर न श्रोसष्यासि विनङ्क्ष्यासि| ऐकले नाहीस तर विनाश ठरलेलाच आहे.
प्रभू खरा आहे. प्रभूचे विचार खरे आहेत. अख्ये जगात् सत्यं शिवं सुंदरम व्हावे यासाठी सर्व मेहनत आहे. म्हणून खऱ्यावर प्रेम वाढवण्यासाठी, संस्कृतीचे काम करण्यासाठी स्वाध्यायप्रवचनाचीच गरज आहे. बळीराजा तर यज्ञही करत होता. तरी भगवंताने त्याला मारले. त्याचे यज्ञही त्याला मारक बनले.
Comments
Post a Comment