ऋत - मनात आलेली गोष्ट आचरणात आणणे.

 ऋत
      स्वाध्यायाने जीवनात गुण येतील. वर्षांनुवर्षे अखंड स्वाध्याय होतो तेव्हा एखादा गुण जीवनात संक्रांत होतो. म्हणून नाजूक अंत:करणाच्या दुबळ्या लोकांचे हे काम नाही.
        ऋत म्हणजे बुद्धीत नक्की झालेली गोष्ट जीवनात आणणे. त्यामुळे सहज विचार येईल की 'माझे' जीवन कशासाठी? माझे जीवन संस्कृतीच्या कामासाठी आहे ही गोष्ट एकदा बुद्धीने निश्चित केल्यावर संसार करताना प्रत्येक क्षणी माणूस ध्यानात ठेवतो की त्याला संस्कृतीचे कार्य करायचे आहे आणि सांस्कृतिक जीवन जो मानतो तोच फक्त माझा, दुसरा कोणी माझा नाही. माझ्याकडून आसुरी संस्कृतीचा नाही तर दैवी संस्कृतीचाच प्रचार होईल, अशी ज्याची पक्की धारणा झालेली असते आणि तेच घोकले आणि केले जात असेल तर त्याला ऋत म्हणायचे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन