गुढीपाडव्याचा संदेश


गुढीपाडव्याचा संदेश 
     ह्या दिवशी कडुनिंबाचे रसपान करण्यात येते. मंदिरात दर्शनाला येणारानाही कडूनिंब व साखर मिश्रित प्रसाद मिळतो. निंब कडू आहे पण आरोग्यदायक आहे. सुरुवातीला कष्ट देऊन महागावून कल्याण करणारांच्या ज्ञातीतील तो एक आहे. कडुनिंबाचे सेवन करणारा सदा निरोगी राहतो. कित्येक विचार आचरणात आणताना कष्ट पडतात एवढेच नाही तर कटू वाटतात. पण तेच विचार जीवन उदात्त बनवतात. तशा सुंदर, सात्विक विचारांचे सेवन करणारा मानसिक व बौद्धिक आरोग्य उपभोगतो. त्याचे जीवन निरोगी बनते. शिवाय प्रगतीपथावर जाणारा जीवनामध्ये काही वेळा 'कडू घोट' प्यावे लागतात; याचेही यातून सूचना मिळते.
     मंदिरात मिळणाऱ्या कडूनिंब मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या पाठीमागे अतिशय मधूर भावना लपलेली आहे. जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही. सुखाच्या मागे दुःख असते आणि दुःखाच्या मागून सुखाचे अनुगमन होते.
        सारांश, हा उत्सव मृतवत बनलेल्या मानवामध्ये चेतना भरून त्याचे अस्मिता जागृत करतो, त्याचबरोबर मानवाला मिळालेले शक्ती, संपत्ती, बुद्धी हे सर्व ईश्वरदत्त आहे असे समजावून त्याच्यात समर्पणाची भावना जागृत करतो. अस्मिता व समर्पणवृत्ती यांच्या समन्वयाने स्वास्थ्य बनलेल्या ह्या मानवाने हसतमुखाने विघ्नांचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुखदुःखांनी पथच्युत न बनता गरज पडली तर अनंत कडू घोट पिऊनही प्रभू कार्यात कठीबद्ध होऊन उभे राहावे असा संदेश हा उत्सव आपणास देत आहे.
      आजच्या दिवशी प्रभूकार्यातील खरा सैनिक बनण्याचा संकल्प करायचा आहे. तसेच मिळालेले जीवन हा प्रभूप्रसाद आहे आणि मिळत असलेले वैभव हे प्रभु चे पादोदक आहे ही भावना दृढ करायची आहे व प्रभू कार्याला लागायचे आहे. असे झाले तरच हा गुढीपाडव्याच्या उत्सव साजरा केल्यासारखे होईल.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन