गुढीपाडवा - विजयाचा संदेश

विजयाचा संदेश
     झोपलेल्यांच्या कानात सांस्कृतिक शंख ध्वनी फुंकण्यासाठी व मृत्त मानवाच्या शरीरात जीवनसंचार करण्यासाठी आज शालिवाहनाची गरज आहे. मानव मात्रा मध्ये ईश्वर प्रदत्त विशिष्ट शक्ती निसर्गतः सुप्त आहेत गरज आहे; फक्त त्यांना जागविण्याची.

        समुद्रोल्लंघनाच्या वेळी कपाळाला हात लावून बसलेल्या हनुमंताला गरज आहे; पाठीवरून हात फिरवून आत्मविश्वास जागृत करणाऱ्या जांबवंताची,
        शस्त्र त्याग करून युद्धपराग्ङमुख होIऊन बसलेल्या अर्जुनाला गरज आहे; उत्साहाप्रेरक मार्गदर्शक श्रीकृष्णाची,
         संस्कृतीच्या सतपुत्रांचे व गीतेच्या तरुणांचे स्वागत व सत्कार करण्यासाठी आजचा समाजही तयार आहे.     
         आजच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी सांस्कृतिक वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची.
            ह्याच दिवशी श्रीरामचंद्राने वालीच्या जुलमातून दक्षिणेकडील प्रजेची सोडवणूक केली होती, असे कित्येकांचे म्हणणे आहे. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघर उत्सव साजरा करून गुढ्या उभारल्या होत्या. अजूनही घराच्या अंगणात जी गुढी उभारली जाते ती विजयाचा संदेश देत असते. घरातून वालीचा, असुरी संपत्तीचा, रामाने दैवी संपत्तीने नाश केला याचे ते सुचक आहे. 

गुढी म्हणजे विजयपताका.
भोगावर योगाचा विजय, 
वैभवावर विभूतीचा विजय,
विकारावर विचारांचा विजय. 

       मंगलता व पवित्रता ह्यांना वातावरणात सतत प्रस्तुत करणारी ही गुढी चढवणाऱ्यांनी आत्मनिरीक्षण करून पाहिले पाहिजे की, माझ्या मनात असलेली वानरवृक्ती, चांचल्यवृत्ती नाश पावली की नाही? माझे मन शांत, स्थिर व सात्विक बनले की नाही?
 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन