गुढीपाडवा - शालीवाहन राजाची एक गोष्ट.

 गुढीपाडवा
        चैत्र प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवाही एक मुहूर्त आहे. शालिवाहन शकाची सुरुवात त्याच दिवसापासून होते. 
        शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडले व त्याला सजीव केले आणि त्याच्या मदतीने प्रभावी शत्रूचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू झाला. शालिवाहनाने मातीच्या सैन्यात प्राण भरला हे एक लाक्षणीक कथन आहे. त्याच्या काळात लोक पूर्णतः चेतनाहीन, पौरुषहीन व पराक्रमहीन बनले होते. म्हणूनच ते शत्रूंना जिंकू शकत नव्हते. मातीचे मुडदे जयश्री कोठून प्राप्त करू शकणार? परंतु शालिवाहनाने येऊन ह्या लोकांत चैतन्य प्रगट केले. मातेच्या मुडद्यात मर्दुमकी प्रगट झाली. दगडाच्या पुतळ्यात पुरुष व पराक्रम जागृत झाला आणि शत्रूचा पराजय झाला. 
        आज आपणही दिन हीन बनलो असून जडवादाशी लढायला समर्थ बनलो आहोत. मनुचे संतान अशा मनुष्याला असा क्षुद्र व मृतवत पाहून सृष्टी निर्माण करणाराला किती दुःख होत असेल! 'अमृतस्य पुत्रा:' असे म्हणून वेद ज्याची बिरूदावली गातात अशा सिंहाच्या छाव्या समान असलेल्या मानवाला बिचारा बनवून फिरत असलेला पाहून प्रभूला काय बरे वाटत असेल?
 

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.