निर्भयता - घंटासूर राक्षसाची एक गोष्ट.
निर्भयता
वेदांतात यासाठी एक घंटासुर राक्षसाची गोष्ट आहे. एक गाव डोंगराळ प्रदेशात होते. गावात हनुमानाचे मंदिर होते. मंदिरात एक घंटा होती. एक दिवस ती खाली पडली. दोन-चार माकडे तिथे आली घंटा पाहून त्यांना तिची नवलाई वाटली. म्हणून ती घंटा उचलून जंगलात घेऊन गेले. त्या घंटेला त्यांनी एका गुंफेत लटकून ठेवले. दिवसभर माकडे दिनचर्यासाठी जंगलात निघून जात संध्याकाळी परत येत. एवढ्या वेळात स्वतःची भाकरी मिळवीत. दुसरे काही करत नसत भाव, प्रेम किंवा आत्मीयता सारखे काही नव्हतेच. संध्याकाळी परतल्यावर टोळके एकत्र जमायचं आणि टांगलेली घंटा वाजवत बसायचं. एका मागून एक माकड घंटा वाजवत बसे. त्या घंटेचा आवाज ऐकून गावातील लोक घाबरले. कुणी म्हणे की घंटा सुर नावाचा राक्षस आवाज करतो. रोज असे आवाज ऐकून गावातील लोक घाबरून रोज पाच वाजयच्या आत घरी येऊन दारे खिडक्या लावून घरात बसून राहत. गावात एक शहाणा माणूस होता. त्याने विचार केला की आपण सगळे घाबरून गेलो पण हा घंटा सुर नावाचा राक्षस खरेच आहे का? आपले रोजचे व्यवहार तर सुरूच आहेत, कोणी राक्षस गावात येत नाही, आपल्याला मारत नाही. जर राक्षस असता तर आपल्याला मारले असते आणि खाऊन टाकले असते. तसे तर तो काही करत नाही, गावात कोणी साठ वर्षाचा आहे, कोणी सत्तर वर्षाचा आहे; कुणाला तो मारत नाही. मग आवाज येतो कुठून ते पाहिले पाहिजे. असा विचार करून तो शहाणा माणूस आवाजाच्या दिशेने हिशकरून, राम नाम घेत घेत जायला निघाला. त्याला लोकांनी विचारलं तर तो सांगायचा की घंटा सुर राक्षसाकडे जातो आहेस, त्याने तुला खाल्ले तर? म्हणून तो पत्नीला, मुलांना भेटून, घराचा आणि घरात राहणाऱ्या सगळ्यांचा मोह सोडून असंगशस्त्रेण दृढेन छित्वा | देवाचे नाव घेत- घेत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तिथे जाऊन पाहतो तर त्याला कुठेच राक्षस किंवा पिशाच्च दिसले नाही. त्याऐवजी तिथे एक घंटा टांगलेली दिसली आणि माकडे मस्ती मध्ये आळीपाळीने ती वाजत होती!
त्याने दुसऱ्या दिवशी गावातल्या सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितले की, 'तुम्ही घंटा सुराला घाबरत आहात, परंतु माझ्याजवळ मंत्रविद्या आहे. मंत्रविद्याने मी उद्या घंटा स्वराचा नाश करीन. आता कोणाला घाबरण्याचे कारण नाही. मागे मी हिमालयात गेलो होतो. तिथे मला सव्वाशे वर्षाचे गुरु भेटले. त्यांनी मला तपश्चर्या करायला सांगितली . मी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. मला भगवंताकडून खास वरदान मिळाले आहे . मला मंत्रविद्या प्राप्त झाली आहे. तिच्या बळावर मी उद्या घंटा सुराला मारून टाकेन आणि संपूर्ण गाव भयमुक्त करीन.'
त्याच्या दुसऱ्या दिवशी तो पुन्हा जंगलात गेला. त्याने घंटा उतरवली आणि दूर कुठेतरी दडवून ठेवली. पुढच्या दिवसापासून आवाज बंद झाला. गावात आल्यावर लोकांनी त्याला म्हटले की तू भूतात पण महाभुत आहेस. ही तर वेदांतातील गोष्ट आहे.
Comments
Post a Comment