ईश्वरवाद - कौरव आणि पांडव यांचा असलेला दृष्टिकोन


ईश्वरवाद 
          आपल्याला भौतिक जीवन समृद्ध बनवायचेच आहे. भौतिक जीवनासाठी लागणारा अन्न, वस्त्र, निवारा सगळ्यांना मिळालाच पाहिजे, पण या गोष्टी मिळवायच्या पण देवाला सोडून नाही. असे म्हणणारे पांडव होते.                   भगवंताची जरूरच नाही, केवळ अन्न, वस्त्र, निवारा मिळाला की आम्ही सुखी होऊ असे म्हणणारा दुर्योधन होता. 

           दोन्ही पक्ष सामाजिक होते. दोन्ही पक्षांना समाजाची फिकीर होती. दुर्योधनाने समाजासाठी पुष्कळ काही केले आहे. दुर्योधनाला कमी लेखू नका. तो भले भ्रांत असेल पण त्याची एक फिलासोपी होती. प्रत्येक व्यक्तीला अन्न, वस्त्र आणि निवारा  दिल्याने लोक सुखी होतील अशी त्याची मान्यता होती. भगवान कृष्णाचे म्हणणे होते की फक्त एवढेच करून तू पुढच्या पिढीला खल्लास करशील. भविष्यातील पिढीचा विचार करून भगवंताला उचलावे लागेल. असे सांगणारा कृष्ण होता. भगवंताशिवाय भौतिक जीवन सुखी होणार नाही, हे निश्चित झाले तर आतील इंद्रियांच्या आकर्षण उत्तरोत्तर उन्नत आणि उदात्त होत जाईल. परिणामी आपण 
आध्यात्मिक होऊ.
   

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.