कौरव आणि पांडव
कौरव आणि पांडव
कौरव पांडवांच्या जमान्यात हाच प्रश्न होता. कौरव पांडवांची लढाई कशासाठी होती? चुलत भावांची लढाई नव्हती. चुलत भावांची ही लढाई असती तर कृष्ण त्यात पडलाच नसता. कारण भगवान् कृष्ण विश्वाला मार्गदर्शन करायला विभूती बनवून आला होता. चुलत भावांची लढाई असती तर श्रीकृष्ण त्यांना म्हणाला असता, सुप्रीम कोर्टापर्यंत जा आणि त्याचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे करा. कदाचित सुप्रीम कोर्टात न्याय झाला नसता तर दुसऱ्या जन्मात न्याय मिळाला असता. पण त्यांच्या झगड्यात तो पडला नसता.
जीवन समृद्ध करण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा मिळाला तर जीवन सुखी होईल असे मानणारा दुर्योधन होता. त्यासाठी तो प्रयत्न पण करीत होता. याला काही जीवन म्हणत नाहीत. अशा जीवनाने अनेक पिढ्यांचे नुकसान होते. म्हणून दुर्योधनाविरुद्ध पांडव उभे राहिले त्यांच्याबरोबर श्रीकृष्ण पण उभा होता.
ईश्वरविमुख की ईश्वरसन्मुख जीवन?
Comments
Post a Comment