लोकोत्तर राम - प्रत्येकाची जीवनात मित्र आणि शत्रू कसा असावा ?


 लोकोत्तर राम
           लोकोत्तर शत्रू देखील रामच. मारीच रामाचे उदात्तता व भव्यता यांच्या वर्णन करताना म्हणतो "मित्र असावा रामासारखा आणि शत्रूही असावा रामासारखाच." रावणाच्या मृत्यूनंतर त्याचे अग्निसंस्कार करायला बिभीषन नकार देतो त्यावेळी राम त्याला सांगतो: "मरणाबरोबर वैर संपते. तेव्हा भाऊ म्हणून शोभेल असा रावणाचा अग्निसंस्कार कर आणि तू नाही केलास तर मी करीन. तो तुझा भाऊ आहे तसा माझाही भाऊ आहे."
      लोकोत्तर वल्लभ म्हणजे राम. साध्वी स्त्रियांची इच्छा रामा सारखा पती लाभावा अशी असते. रामाचे सीतेवर अलौकिक व अमर्याद प्रेम होते. त्या प्रेमगीताने रामायण भरलेले आहे. रामाने सीतेचा त्याग केला या प्रसंगावरून काही लोक राम सीतेच्या प्रेमाबद्दल शंका उपस्थित करतात. परंतु ती शंका आनाठाई आहे. राम राजा होता. राजा म्हणून प्रजेचा विश्वास संपादन करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य होते. यादृष्टीने राजा म्हणून रामाने राणी सीतेचा त्याग केला नाही तर पतीने पत्नीचा त्याग केला आहे दांपत्यधर्म व राजधर्म या दोहामध्ये निर्माण झालेल्या संघर्षाची रामाने योग्य उकल साधलेली आहे. रामाने पत्नीचा त्याग केला असता तर यज्ञ प्रसंगी रामाने दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले असते परंतु रामाने तसे न करता स्पष्ट भाषेत सांगितले आहे, "रामाच्या ह्रदय सिंहासनावर एकाच स्त्रीला स्थान आहे आणि ति स्री म्हणजे सीता." शेवटी सीतेची सुवर्ण प्रतिमा बनवून यज्ञ केलेला आहे.
       वव सीताही जन्मोजन्मी रामच पती लाभावा अशी कामना करते. या रीतीने पाहता रामाचा सीता त्याग हे आत्मबलिदानाच्या उच्चतम भावनांचे प्रतीक आहे.
      रामाला स्वतःची जन्मभूमी फारच प्रिय होती. वालीला मारल्यानंतर किष्कंधेचे राज्य तो सुग्रीवाला देतो आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य बिभीषणाला देतो. ही राज्य सुंदर व समृद्ध होती पण रामाने त्यांचा मोह धरला नाही.
            'दुर्लभं भारते जन्म|' ज्य भूमीमध्ये जन्म दुर्लभ आहे त्या भूमीत जन्म मिळाल्यानंतर त्या भूमीचे महत्त्व त्यांना कोण समजावणार? राम उपासकांचे हे काम आहे. रामनवमीच्या दिवशी या कार्यासाठी कटीबद्ध व्हा. मानव मात्राला प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या, सागरासारख्या गंभीर, आकाशासारख्या विशाल व हिमालयासारख्या उदात्त श्रीरामाच्या जीवनाचा विचार करून त्याचे गुण जीवनात आणण्यासाठी, त्याचे विचार व संस्कृती समाजात टिकून ठेवण्यासाठी कृतनिश्चयी बनलो तरच खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी केली असे म्हणता येईल.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन