राम - पहिली दैवी अवतारी आत्मा.
व्यक्ती ही देवत्व प्राप्त करू शकते हो कोणतीही व्यक्ती आपल्यामध्ये दैवी रूप आणून दैवत प्राप्त करू शकते.
रामातील देवत्व रामाने निर्माण केले आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता झाला. भर दुपारी व कडकडत्या उन्हात श्रीरामाचा जन्म झाला. जीव व जग जेव्हा आधी, व्याधी व उपाध्यी यांनी तप्त होतात, तेव्हा त्यांना शांती व सुख देण्यासाठी; प्रेम, पावित्र्य व प्रसन्नतेचा पुंज असा प्रभु राम जन्म घेतो.
रामाचा जन्म उत्सव भारतात ठिकठिकाणी मोठ्या धुमधडाक्याने साजरा केला जातो. कारण त्याच्या जन्माने व जीवनाने संपूर्ण राष्ट्राला माननीय मार्गदर्शन लाभलेले आहे. कौटुंबिक, सामाजिक, नैतिक, तसेच राजकीय मर्यादेत राहूनही पुरुषोत्तम कसा होऊ शकतो हे मर्यादा पुरुषोत्तम रामाचे जीवन आपणाला समजावते. रामातील देवत्व रामाने निर्माण केले आहेन. मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे राम स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवतो आणि तसलीच व्यक्ती देवत्व प्राप्त करू शकते याची प्रतीती महर्षी वाल्मिकींनी आपल्याला करून दिली आहे.
Comments
Post a Comment