रामनवमी - भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ

Rama Navami is a Hindu festival that celebrates the birth of Ram Lalla


भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ

        राम कृष्ण हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ व भारतीय जनतेचे निष्ठाकेंद्रे आहेत. राम कृष्णाच्या रंगात भारत जेवढा रंगला आहे, तेवढा दुसरा कोणाच्याही रंगात रंगलेला नाही. प्रत्येक भारतीयांच्या हृदयावर त्यांचे प्रेम शासन अजूनही चालू आहे. पुन्हा पुन्हा ऐकू येणारा 'श्रीराम जय राम जय जय राम' आणि 'गोपाल कृष्ण, राधेकृष्ण' याचा उद्घोष याची साक्ष आहे.

      आपल्या जीवनात राम पूर्णतः एक रूप झालेला आहे. भारतातील खेड्यात दोन व्यक्ती रस्त्यात समोरासमोर आल्या तर त्या परस्परांना हात जोडून 'राम राम' म्हणतात. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीत मानवाचा भगवंताच्या रक्षण-शक्तीवर असलेला विश्वास प्रतिबिंबित होतो. 'ठेविले अनंन्ते तैसेचि राहावे' ह्या शब्दात खऱ्या भक्ताच्या समर्पण वृत्तीची चुनुक दिसते. प्रभू विश्वासावर चालणारा मानव, कार्य किंवा संस्था याच्यासाठी 'राम भरोसे' हा शब्दप्रयोग आपल्या येथे प्रचलित आहे. 'घटाघटात राम भरलेला आहे' हा शब्दसमूह ईश्वराच्या सर्व व्यापकतेचे दर्शन घडवतो. कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्यव्यवस्थेसाठी 'रामराज्य' शब्द पर्याय म्हणून वापरला जातो.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन