दैवयुक्त कर्तव्य की कर्तृव्ययुक्त दैव ? यांना समजावून सांगताना गीता ग्रंथ.

  

कर्तृत्वावर विश्वास पाहिजे.
         मानवाला उभे करायला, जीवन समृद्ध करायला, कर्तृत्व करायला लागेल. काही जण जीवन समृद्ध करण्यासाठी दैवासमोर मान झुकवतात. हे दोन्ही अर्धे कच्चे आहेत असे समजणे हा बुध्दीचा भक्कमपणा आहे.जीवनात कर्तृव्य आणि दैवाला योग्य स्थान दिले पाहिजे. 

दैवयुक्त कर्तव्य की कर्तृव्ययुक्त दैव?
दैवयुक्त कर्तृत्व मानणारे मस्त नमणारे लोक आहेत आणि 
कर्तुत्वयुक्त दैव मानणारे गीता वाचणारे लोक आहेत.

        गीता दैवाला मानते. त्यासाठी भगवान कृष्णाने गीतेत म्हटले आहे.- अधिष्ठानं तथा कर्ता कारणं च पृथग्विधानम्| विविधाच्छ पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पच्चमम|| गीता ग्रंथ आहे कादंबरी नाही. कर्तव्ययुक्त दैव हे गीतेला सांगायचं आहे आणि दैवयुक्त कर्तृत्व हे आपल्याला म्हणायचे आहे. कर्तृत्वशून्यतेतून समृद्धी मिळाली पाहिजे असे लोक मानतात. एका रूपात लाख रुपये काही लोकांना मिळतात पण नशीब आजमवण्यासाठी दोन कोटी लोक वेडे होतात ! चार लोकांना रुपये मिळतात, त्यांचे फोटो काढले जातात! विनाकष्ट पैशाची लालू दाखवणाऱ्या शासनाला काय शासन म्हणतात? असे विनाकष्ट पैसे मिळत असतील तर माणसाने घर फोडून पैसे का न मिळवावा? एक रुपया तरी कशासाठी द्यायचा? विना कष्ट पैसा मिळवण्याचे प्रलोभन दाखवणारे पालक नाहीत, शास्ता नाहीत ते मारक आहेत. त्यांच्या हातात मानव जातीची धूरा आहे तेच हे काम करतात. आपणच त्यांच्या हातात धुरा दिली आहे. हे लोक ओरडून सांगतात 'हा धर्म-बिर्म काही नाही हो! ह्या धर्माने सर्व घोटाळा केला आहे'. त्यांना विचारलं पाहिजे राजनीतीने काय सुधारले आहे. वास्तविक विना मेहनतीचे पैसे नकोत. धर्माचे रूप कसे असले पाहिजे? धर्माचे स्थान कुठे आहे? त्याचे संशोधन झाले पाहिजे.
          दैवं चैवात्र पच्चमम् असे सांगून गीता कर्तुत्व युक्त दैव समजावते. भगवंतांनी पंचम्म म्हणून दैवाला पाचवे स्थान दिले आहे. भगवान दोन हजार वर्षांपूढचे ही बघतो. पुढचे भविष्य पाहून भगवान सांगतो. गीतेचा पंचम शब्द सुमधुर आहे. हा सिद्धांत जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत जीवन समृद्ध होणार नाही. मानव देखील उभा राहणार नाही. मानवाची विचारधारा पंगू झाली आहे. कोणीही येतो आणि बोलू लागतो.' दुनिया झुकती आहे, झुकानेवाला चाहिये' दुनियाला काही पायाच नाही. गंगा गये गंगाधास आणि जमणा गये जमनादास! असे लोक आहेत! लोक मला झुकवतात आणि मी झुकतो! हे काय मानव्य आहे? मला कोणी नमवू शकत नाही. या सर्व गोष्टीचा विचार केल्यावर असे वाटते की, भगवान आणि अध्यात्माची अनिवार्य जरुरी आहे.
  

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन