स्वाध्याय करत असताना किती एकाग्रतेने करावा ?
स्वाध्याय
स्वाध्यायात जाल तेव्हा ऐकता ऐकता दुसरे काम करू नका. ते सगळे कथा, कीर्तनात ठीक आहे. कथा ऐकत असतो आणि दुसरीकडे हातात माळ घेऊन जप चालू असतो. काही भगिनी कथा ऐकायला जातात तिथे ऐकता ऐकता सोबत विष्णुसहस्रनामासाठी तुलसी दल मोजून ठेवत असतात. हे लोक त्याला भगवंताचे काम समजत असतील, म्हणून म्हटले आहे. नान्यकार्येसू लालसा | ऐकताना दुसरे काम करू नका. एका चित्ताने ऐका. कित्येक भगिनी तर सेठजीच्या घरून कथा कीर्तनाचे आमंत्रण मिळाले तर ऐकायला जातात पण जाताना सोबत वाटाणे बरोबर नेतात. एकीकडे ऐकत असतात आणि दुसरीकडे वाटाणे सोलत असतात.
स्वाध्याय ऐकायला जाल तेव्हा वाचेचे वृत्त घ्या. स्वाध्याय चालला आहे तोपर्यंत बोलायचं नाही.
Comments
Post a Comment