अहम ब्रह्मास्मी - भगवंत सर्वव्यापी आहे का ?

 

Aham Brahmasmi (ah-HUM brah-MAHS-mee) is a Sanskrit sutra 


अहम ब्रह्मास्मी

         भगवंत सर्व व्यापक आहे. प्रथम माझ्यात भगवंत आहे. जोपर्यंत ही दृष्टी येत नाही तोपर्यंत व्यक्ती दिनच राहते. भगवंत माझ्यासोबत आहे ही दृष्टी सतत मिळायला हवी. यासाठी जाणवे घालायचे असते. जाणव्याचा आणि कर्मकांडाचा काही संबंध नाही. पण जानवे आणि अध्यात्माचा संबंध आहे. परंतु ते कर्मकांड बनले आहे. त्यामुळे जातिवाद उभा राहिलेला आहे. जाणव्याचा मूळ अर्थच निघून गेल्यानंतर दुसऱ काय होणार? जाणव्यामध्ये आपण आपल्या हातानेच भगवंताला बसवतो, प्राणप्रतिष्ठा करतो. 

             माझ्याबरोबर भगवंत आहे ही दृष्टी आली तर व्यक्तीचे जीवन नियंत्रित तर होईलच पण त्याचबरोबर व्यक्तीला उत्साह पण मिळेल. माझ्याबरोबर माझा भगवंत आहे ही कल्पना व्यक्तीला गुदगुल्या करते. ज्याला याचा प्रत्यक्ष अनुभव होत असेल त्याचे काय होत असेल? अहम ब्रह्मास्मी| चे ज्ञान आधीपासूनच असले पाहिजे आणि शेवटी त्याचा अनुभव येतो. मानवी जीवन विकसित करण्यासाठी माझ्यात भगवंत आहे हे ज्ञान झालेच पाहिजे.

          परिस्थिती वादाने आणि नियती वादाने मानवाला मारले आहे. याला औषध नाही. माणूस काहीतरी चुकीचे करतो आणि बचावा खातर म्हणतो की परिस्थितीच अशी आली की त्यामुळे त्याला तसे करावेच लागले. तर कोणी नियतीला दोष देतात. 

       आत्मविश्वास जागृत करावा लागेल, स्वयंसंपन्नता उभी करावी लागेल असे वेदांताने सांगितले आहे. विश्वास आणि प्रेम उभे करावे लागेल. भगवंतावर विश्वास आणि लोकांवर प्रेम निर्माण करावे लागेल. तसेच माझ्यासाठी स्वयंसंपन्नता उभी करावी लागेल. त्यासाठी स्वाध्यायाची आवश्यकता आहे. त्याशिवाय समस्या सुटणार नाही. केवळ एकदोनदा ऐकून चालणार नाही. तेच तेच विचार वारंवार ऐकणे म्हणजे स्वाध्याय. तरच ते विचार बुद्धित स्थिर होतील आणि जीवनात उतरतील. लोक रोज तीच ती भाकरी खात असतात‌. त्याच पेढीवर जाऊन त्याच गादीवर बसून व्यापार करतात. त्याच नोटा रोज मोजतात‌. हे सर्व त्यांना चालते पण तीच गीता रोज वाचायला मात्र त्यांची हारकत आसते. ज्यांना जीवन बदलण्याची इच्छा नाही, मन, बुद्धी स्वच्छ करायची नाही, तेच लोक असे बोलतात. त्यांना अमानुष नाही तर दुसऱ्या काय म्हणायचे?

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन