सृष्टीवर असलेले भगवंताचे अस्तित्व


भगवंताचे अस्तित्व
         ते तत्व बुद्धिहून पर आहे. तुम्ही बुद्धीने ते समजून घेऊ शकता; परंतु त्याचा अनुभव बुद्धीने घेता येत नाही. बुद्धीने भगवंताचे अस्तित्व निश्चित होते. तो तुझ्या सोबत आहे आणि आतल्या साऱ्या क्रिया तो चालवत आहे हे समजले पाहिजे. तू स्वतःला जाणून घे. तू कोण आहेस, तुझ्या आत काय मसाला भरला आहे, तुझे जीवन कसे चालते आहे, कोण चालवतो आहे, हे जाणून घे. 
            मला दोन डोळे कशासाठी दिले आहेत? दोन डोळ्यांची काय गरज आहे? एकच डोळा असता तर काय झाले नसते? एका डोळ्याने त्रिमिती समजत नाही असा शोध लागला तेव्हा आपल्याला लक्षात आले की दोन डोळे असले पाहिजेत. कोणी हा विचार केलाय का की मला दोन डोळे कोणी दिले? ना बापाला माहित, नाही मला माहित. 
         देणारा कोणी दुसराच आहे. हे आधी बुद्धीने नक्की करावे लागेल की भगवंत माझ्यासोबत आहे. भगवंताने केवढे सुंदर डोळे दिले आहेत! 
बोलतो कोण, तर तो;
 फिरवतो कोण, तर तो;
 चालवतो कोण, तर तो.
        पण आपल्याला असे वाटते की सगळे आपण करत आहोत. भगवंतानेच मला प्रेमाने सांभाळले आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आईच्या स्तनात दूध त्याने बनवले. मी असे प्रेम कोणावर केलेले नाही. त्यामुळे मी तुझे प्रेम समजू शकलो नाही. हेच वेदांताला सांगायचं आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन