ज्ञानियांचा राणा.

      
        भगवान शंकर हिमाच्छादित धवल गिरिशिखरावर बसलेले आहेत. ज्ञानाची बैठक विशुद्ध असली पाहिजे, असे तह्याच्यात सुचित केले आहे. चारित्र्याच्या शुद्ध बैठकी शिवाय ज्ञान शोभत नाही.
         कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले शंकर आपल्याला समजावतात की, 'शिव' म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. शिव ही रस्त्यावर पडलेली गोष्ट नाही. कल्याणाचा मार्ग अवघड व काटेरी असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक कठीण चढणी चढाव्या लागतात. कठीण साधने शिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवणाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही.
        शंकर त्रिलोचना आहेत. तिसऱ्या डोळ्याने त्यांनी काम-दहन केले आहे. खऱ्या ज्ञानवंतावर झालेले कामाचे प्रहार बोथट ठरतात. एवढेच नाही तर खरा ज्ञानी स्वतःच्या ज्ञानाने कामनांना जाळून टाकतो.
         पुष्पदंत कवीने स्वतःच्या शिवमहिन्म- स्तोत्रात म्हटले आहे की, भगवान विष्णू शंकराची पूजा करीत होते. सहस्त्र कमळे वाहायची होती. एक कमळ कमी पडताच स्वतःचे नेत्र-कमळ काढून वाहिले. ते देखील एक रूपक आहे. शंकर ज्ञानाची देवता आहे तर विष्णू प्रेमाची देवता आहे. शंकराला विष्णूचा डोळा मिळाला पाहिजे. अर्थात ज्ञानवंताने प्रेमाच्या नजरेने सृष्टीकडे पाहिले पाहिजे. प्रेमविरहित केवळ ज्ञान जीवनाला व जगाला ही निरानंदी बनविल. ज्ञान अथवा विज्ञान विश्लेषणाचे आग्रही असते तर प्रेम समन्वय किंवा संश्लेषण मानते. विश्लेषण वस्तूला छिन्नविछिन्न करून पाहते तर समन्वय वस्तू मधील सौंदर्य अनुभवतो. ज्ञान व प्रेम यांचा समन्वयच वस्तूला वस्तूत: जाणतो आणि तरी देखील तिचे सौंदर्य उपभोगतो. 
        

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन