तत्वज्ञान - श्रेष्ठाने जीवनात करावयाची कृती
वैदिक तत्त्वज्ञान सांगणारा ब्राह्मण श्रेष्ठ मानण्यात येई. श्रेष्ठ ब्राह्मण वेद सांगत आणि सूत पुराण सांगत. उत्कृष्ट आणि श्रेष्ठ ब्राह्मणाचे चित्र आहे ते निराळेच आहे. आज आपल्याला वाटते की पुराण सांगणारा अथवा सत्यनारायणाची कथा सांगणारा आपला आध्यात्मिक मार्गदर्शक. काही लोक म्हणतात की आमचे भटजीबुवा पोथी न वाचता देखील सत्यनारायणाची कथा चांगले सांगतात.
ब्राह्मणाचे सर्वश्रेष्ठ जीवनश्रेणी कोणती? विशुद्ध अध्यात्मिक जीवन कशात आहे? त्याचा अर्थ निघून गेलाय. त्याच्यातील तेज गेले अध्यात्म म्हणजे काय हे माणसाला समजत नाही . म्हणूनच वित्त खोटे आहे, संसार खोटा आहे, बायका मुले खोटी आहेत, मी पण खोटा आहे याचे नाव तत्त्वज्ञान. असे झाले. ह्यामुळे जीवनात पराडमुखता आली . परिणामी म्हातारे झाल्यावरच तत्त्वज्ञान वाचायचे असा विचार रूढ झाला. खाल्लेले पचत नाही. खाता येत नाही कारण दात पडलेत. डोळ्यांनी कमी दिसते. एक तास एका ठिकाणी बसवत नाही त्यामुळे शनिवार आपण जाता येत नाही. मग चला, सत्संग करू ! अशी स्थिती आली आहे.
खऱ्या अर्थाने ब्राह्मण असेल तो वेद वाचेल. वेदात अवघे जीवन समजावले आहे .त्यात निराशावादी दृष्टीकोन नाही. त्यात असक्ती नाही तशीच अनासक्ती सुद्धा नाही. वैदिक तत्त्वज्ञानात ज्याला चंचुप्रवेश करता येत नाही. असा ब्राह्मण शास्त्र वाचतो. शास्त्र वाचणे देखील जड जाते तो ब्राह्मण पुराण वाचतो . पुराणपण वाचू शकत नाहीय ते उपजीविकेसाठी शेती करतात.
वेदांचे तेजस्वी तत्वज्ञान कुठे आणि पुराणे कुठे? परंतु आम्ही पौराणीक गोष्टीच पकडून बसलेले आहोत आणि त्यालाच श्रेष्ठ समजत आहोत. त्यामुळे जीवनाला एक उलटाच प्रवाह प्राप्त झाला आहे. मी पुराणाची मस्करी करत नाही. पुराणे मला मान्य आहेत. पुराणे आपलेच ग्रंथ आहेत परंतु पुराणांचा नंबर तिसरा आहे. त्याचा नंबर पाहिला नाही. याचे जे स्थान आहे ते स्थान त्याला द्यायला पाहिजे. तरच ते योग्य ठरेल. वेद, स्मृती आणि पुराण असे उत्तर होतं श्रेणी आहे.
Comments
Post a Comment