स्वाध्याय म्हणजे काय ?
स्वाध्याय जेव्हा तेजस्वी ग्रंथाचा झाला पाहिजे. स्वाध्याय करणारा आणि करावीनाराणामध्ये आत्मिक प्रेम असले पाहिजे. स्वाध्याय म्हणजे व्याख्यान नाही. स्वाध्याय आख्यान पण नाही. स्वाध्यायात जाहिरात नसते. अमुक दिवशी फलाना वक्ता बोलणार आहे. अशी जाहिरात असेल तर त्याला व्याख्यान म्हणतात. अख्यान, व्याख्यान वेगळे आणि स्वाध्याय वेगळा. स्वाध्यायात श्रोता, वक्ता यांच्यात एकता असली पाहिजे. वक्त्याला स्रोत्यांना बघण्याची उत्कट इच्छा झाली पाहिजे. आणि वक्त्याला पाहून श्रोत्यांचा हृदय सागर उच्चंबळून आला पाहिजे. अशी श्रोता व वक्ता यांच्यात ऐक्य ज्या ठिकाणी असेल तिथे स्वाध्याय सुरू होईल. जिथे ऐक्य आहे तिथे भगवंत येतो .
स्वाध्यायात आत्मियतेचा संबंध आहे. स्वाध्यायात वैदिक तत्त्वज्ञान पाहिजे. स्वाध्याय येणारा स्वतः श्रद्धेनेच येतो. तो प्रेमाने स्वाध्याय करतो. स्वाध्यायाला येणाऱ्या श्रद्धाचे वर्णन केले पाहिजे. श्रद्धा भक्ती समायुक्ता नान्यकार्येसू लालसा| याला पुण्यशाली श्रद्धा म्हणतात. तो जे ऐकतो त्याला श्रवण म्हणतात. श्रोत्याजवळ श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा म्हणजे वेडेपणा नाही, वहीम नाही, स्वाध्याय स्वतः स्वतःच्या अंतकरणात श्रद्धा भक्ती असते.
स्वाध्याय भक्तीने केला पाहिजे. ज्या ग्रंथाचा स्वाध्याय करतात त्यावर तुमचे प्रेम असले पाहिजे. गीता वाचत असाल तर गीतेवर प्रेम व भक्ती असते. गीता सांगणारा भगवान श्रीकृष्णाबद्दल आत्मियता असली पाहिजे. चला आपल्याला काही काम करायचं नाही तर गीता पाठशाळेत जाऊया. त्याला काही स्वाध्याय म्हणत नाहीत. घरात बसायला जागा नाही. एक तास गेलो तर तिथे लोडला ठेवून बघायला मिळेल. आणि डोक्यावर पंखा पण फिरत असेलb ßi9p. इतरत्र ज्याला टेकायला लोड मिळत नाही त्याला पाठशाळेत मिळतो. चित्त लागले तर ऐकू नाहीतर झोप काढू. अशा जाणाऱ्यांचा स्वाध्याय होत नाही. स्वाध्यायात आत्मश्रद्धा आणि ईशश्रद्धा पूर्ण असली पाहिजे. स्वाध्यायात ऐकायला जाणारा, श्रद्धेने भरलेला असला पाहिजे. त्याला वाटले पाहिजे की गीता किंवा उपनिषद हे माझे ग्रंथ आहेत. म्हणून मी भाव आणि श्रद्धेने ऐकायला जाईल
Nice
ReplyDelete