तिन्ही काळांचा विचार करत चाललेले आध्यात्मिक जीवन

गती 
            भुतं, भविष्य आणि वर्तमान हे तीन काळ बघणारा , विचार करणारा अध्यात्मिक आहे, त्याचे समृद्ध जीवन सुखी होते. भूतकाळात कृतज्ञता येते. एकेकाळी कुणी प्रेम केले होते, आता त्याची जरूर नाही, तरी पण त्याची आठवण ठेवली पाहिजे. ज्याच्या प्रेमामुळे आता मी उभा राहिलो आहे त्याची आठवण ठेवणे हा भूतकाळ आहे, त्यात कृतज्ञता आहे. अशी कृतज्ञता उभी केली पाहिजे. वर्तमानात भाव आणि प्रेम येते. मला कुणाला भाव आणि प्रेम द्यायचे आहे. प्रेम ही मिळविण्याची गोष्ट नाही, देण्याची गोष्ट आहे, ही विशुद्ध जीवनाची परिणती आहे. प्रेम ही मागण्याची गोष्ट नाही. तुम्ही प्रेम देत जा म्हणजे समोरच्याचे प्रेम मिळत राहील. आपण देण्यात कंजूष आहोत आणि घेण्यात? ते सांगण्याची गरज नाही की आपण घ्यायला शिकलो आहोत. तुम्ही कुणाला प्रेम दिले नाही, तुमच्यावर कोणी केलेले प्रेम समजण्याची जाण पण तुमच्यात नाही, प्रेम उचलण्याची तयारी नसेल, प्रेम समजण्याची बुद्धीत शक्ती नसेल तर तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपये असले तरी पण तुम्ही सुखी होणार नाहीत. देवाने स्वतः येऊन तुम्हाला सुखी करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही सुखी होणार नाहीत.
          भविष्यात गती येते. पुढचे पाहायचे आहे, भविष्याचे पाहायचे आहे. आज तुमच्याजवळ बुद्धी आहे पण पुढच्या जन्मात ती मिळेल? दुसरा जन्म आहे की नाही हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. जोपर्यंत दुसरा जन्म आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत या बाबतीत विचार करणे व्यर्थ आहे. पुनर्जन्म सिद्ध होऊ शकतो पण तुझी बुद्धी कमकुवत असेल तर सिद्ध करता येणार नाही. अरे! काही विचार केला पाहिजे की पुढचा जन्म- गती आहे की नाही? आपली गती बंदच होत नाही. दहा दिवसाचा झालो, महिन्याचा झालो, वर्षांचा झालो अशी गती चालूच आहे. त्याप्रमाणे आपली गती हा देह सोडल्यावरही चालूच राहते. म्हणून आपली मागणी असते की, मेलेल्या सद्गति मिळो.
         जशी भविष्याची गती बघितली पाहिजे, तशीच भविष्यातील पिढीची पण गती बघितली पाहिजे. माणसाने विचार केला पाहिजे की त्याचा मुलगा सुखी होईल? तो आज शास्त्राचे बंधन तोडतो आहे, अव्यवस्थितरित्या बोलतो आहे, त्यामुळे त्याचा नातू सुखी होईल? त्याने घरात काय आणले? बोलून- बोलून, वाचून- वाचून, लिहून -लिहून तो विश्वात एक दुर्गंधी पसरवतो आहे. भाषा सुंगध आणण्यासाठी असते पण त्यांनी त्या भाषेत मनोरंजनाच्या रुपये दुर्गंध भरला आहे.
    
 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन