शरीरातील चमत्कार - आपल्या शरीरातील होणारे चमत्कार
शरीरातील चमत्कार
विचार करा, झोप कोणी दिली? झोप कशासाठी दिली? झोप म्हणजे काय? त्या शरीराच्या बाबतीत विचार केला तर बुद्धीला चक्कर येईल. प्रथम आपल्या स्वतःला ओळखा. तरीदेखील बुद्धीला चक्कर येते. भगवंताने मला किती चांगल्या रीतीने सांभाळले आहे. कसे दात दिले आहेत! संपूर्ण शरीर पोटात तयार होते, पण आईच्या पोटात जीव असतो तेव्हा दात तयार होत नाहीत. जन्माल्यानंतर काही महिन्याने दात येतात. त्याचे कारण काय? जीव जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेतो तो कशाप्रकारे, त्याचे डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटते. ही बाब लाजवाब आहे.
जोपर्यंत शरीरात ऑक्सिजन जात नाही तोपर्यंत लिव्हर मध्ये शक्ती पैदा होत नाही. अन्नरस तयार होत नाहीत. जर जन्मा सोबतच बालकाला दात असते तर काय झाले असते? या बालकाच्या अठरा वर्षाच्या आईच्या हातात पुष्कळ मोठा जीव भगवान देतो. आई बिस्किट खाते तेव्हा बाळाला सुद्धा भरले तर काय होईल? बाळ मरून जाईल. भगवंताला त्याला सांभाळायचं आहे. म्हणून जन्माल्यानंतर बाळाला हळूहळू दात देतो. भगवंताने आपल्यावरती केवढे प्रेम केले आहे! आपल्याला किती सांभाळले आहे! हे दाखवून देण्यासाठी मी तुम्हाला हे सगळे सांगतो आहे.
भगवंताने जीवाला कशासाठी सांभाळले आहे. त्याच्यापाठी काही कारण आहे? त्याच्यामागे त्याची काही मागणी आहे? त्याच्या मागे त्याची एखादी अपेक्षा आहे? काही आकांक्षा आहे? काही नाही. निरपेक्ष निराकांक्ष असा तो भगवंत! त्याला आभाराची पण अपेक्षा नाही. उठल्यावर खायचं आणि खाल्ल्यावर झोपायचं, झोपून उठल्यावर पुन्हा खायचं, असा आपला सगळा उद्योग चालत राहिला आहे. असे असून भगवंत आपल्यावर कधीही नाराज होत नाही. संपूर्ण चयापचय क्रियेबाबत विचार केला तर समजेल की भगवंताने कसे अद्भुत बनवले आहे.

Nice ha
ReplyDelete