होळी का साजरी करावी ?
होळीचा संदेश
प्रल्हादाने लहान मोठ्या सर्वांना प्राणवान बनवले. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी खांबातून नरसिंह प्रगटला तो हाच! खांबासारख्या जड, चेतना शून्य व निष्क्रिय बनलेल्या लोकात प्रल्हादाने प्राण भरला. नरांमध्ये सिंह प्रगटवला. नरातील प्रेम व सिंहात असलेला अविवेक किंवा साहस एकत्र झाले आणि त्याने हिरण्यकश्यपूला मारले. लोक हृदयात असलेल्या प्रलादाबद्दलच्या प्रेमामुळे लोक अविवेकी बनले आणि त्यांच्यात निर्माण झालेल्या सहासवृत्तीने त्यांना हिरण्यकश्यपू ला मारण्याची प्रेरणा दिली. हिरण्यकश्यपूला नर किंवा पशु, घरात किंवा बाहेर, रात्री केव्हा दिवसा कोण मारू शकणार नाही असे वरदान होते. ते त्याच्या अतिशय कडक आत्मरक्षणाच्या व्यवस्थेचे द्योतक होते. असत् वृत्ती आतून घाबरलेलीच असते. ती स्वतःच्या रक्षणाचे नेहमी अशीच कडक व्यवस्था करते. परंतु जनमानसात जागृती झाल्यानंतर त्या असत वृत्तीला विराट नरसिंहसमोर नमावेच लागते. लोकजागृती व लोकसंघटन यांच्यासमोर दुष्ट वृत्तीचा पराभव होतो; ही गोष्ट होळी आपल्याला समजावते.
होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा कचरा जाळला पाहिजे असे नाही तर आपल्या जीवनात असलेले आपणास त्रास देणारे खोटे विचार तसाच मनाचा मळ किंवा कचराही जाळला पाहिजे. संघनिष्ठेला शिथिल बनवणारे खोटे तर्ककुतर्क या होळीत दहन केले पाहिजेत. शिवाय शक्ती व ज्ञान यांच्या अभावामुळे हृदयात असलेली केवळ भोळी भावना किंवा अशाही कार्य साधक बनत नाही. तेव्हा जडवाद किंवा भोगवाद यांच्याशी लढणारा प्रभूसैनिक भावनिष्ठ बुद्धी तसेच बुद्धिनिष्ठ भाव ह्यांनी सुसज्ज असला पाहिजे.
होळीच्या उत्सवात थोडी अश्लीलता मिसळली आहे. त्याचे कारण तो सार्वजनिक उत्सव आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या संस्काराचे संमिश्रण त्यात पाहायला मिळते.
सारांश, होळीचा उत्सव फाल्गुणाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनवणारा, वसंतातही संयमाची दीक्षा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजावणारा व मानव मनात व मानव समाजात असलेल्या असद्वृत्तीना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे.हान, मोठा भेद विसरून महालात आणि झोपडीत राहणारे लोक एकत्र येऊन नाचू लागले. ह्यात प्रलादासारख्या महापुरुषाचे कर्तृत्व दिसते.
👌
ReplyDelete