होळीची अग्निपूजा विधी
होळीची अग्निपूजा
आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्या होलिकेने प्रल्हादा सारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेची हजारो वर्षापासून आपण कशासाठी पूजन करतो? होलिकेच्या होत असलेल्या पूजनाच्या मागे एका दुसऱ्याच गोष्टीचे स्मरण आहे. ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्निप्रज्वलित करून त्याने प्रल्हादाला जाळू नये यासाठी त्याची प्रार्थना केली होती. प्रल्हादाने लोक हृदयाला इतके जिंकले होते. त्याचे या घटनेवर प्रतिबिंब पडलेले आहे. आग्नीने लोकांच्या अंतकरणाची प्रार्थना स्वीकारली. लोकांनी इच्छिले होते ते घडले. होलिका नष्ट झाली आणि अग्नीदिव्यातून पार उतरलेला प्रल्हाद नर श्रेष्ठ बनला. प्रल्हादाला वाचविण्याच्या उद्देशाने चालू झालेली घराघरातील अग्निपूजा कालक्रमांमध्ये सामुदायिक पूजेत रुपांतरित झाली आणि त्यामुळेच आज चौका-चौकात होत असलेली होलिका-पूजा रूढ झाली. यादृष्टीने पाहता, होली का पूजन हे असद्वृत्तीच्या नाश्यासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या ह्रदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतिक आहे आणि म्हणूनच लोक आनंदाने होलिकेचे स्वागत करतात.
होलिका दहनामुळे खुश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. आनंदाच्या वातावरणाने रंगीत बनलेले लोक एकमेकावर रंग, गुलाल वगैरे उडू लागले. शिवाय काहींनी धुळ उडवायला सुरुवात केली आणि त्यामुळे 'धुळवड' निर्माण झाली. आकाशातील रंग आणि धरतीवरील धूळ यांचे या उत्सवात मिलन झालेले आहे.
Comments
Post a Comment