होळी - फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा उत्सव


होळी 
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी. ' देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते. त्या दिवशी लोक थोड्या स्वौरपणे वागतात.कडक शिस्त व शिथिल स्वौराचार यांच्या मधला बिंदू जो शोधून काढतो तोच होळीचा उत्सव मनापासून साजरा करू शकतो.
       होळीचा उत्सव म्हणजे वसंताला वाढवणारा उत्सव! परंतु वसंताच्या वैभवातही संयमाचे सूत्र विसरता कामा नये. भगवान शंकराने केलेले काम दहनही एक सुंदर तत्व सांगून जाते. वसंतला निमित्त करून जर काम शिवत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर तो स्वतःचा नाशच जवळ आणिल. मर्यादित असलेला काम भगवंताचे विभूती आहे आणि मर्यादा ओलांडली तर ते त्याला आत्मघातक आहे.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.