संतती - उद्याचा काळ जगण्यासाठी चांगल्या संगतीत वाढलेली संतान.
संगतीची वेगवेगळी रूपे आहेत. गुणसंगती, विचार संगती, स्वाध्याय पण सत्संग आहे, जर तो चांगल्या प्रकारे समजलो तर! आपल्याला मुक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे, एवढ्यासाठी सत्संग आणि स्वाध्याय आपण करत असतो. मुक्ती पाहिजे ही तर उच्च गोष्ट आहे. मुक्ती पाहिजे ही दुसरी गोष्ट आहे. आपल्याला संगती पाहिजे- विचारांची आणि व्यक्तीची संगत पाहिजे. संतती चांगली मिळाली तर अर्थातच संकल्प चांगला होतो.
इथे येणारे लोक वेगवेगळ्या वृत्तीचे असतात. तरुणांना जर चांगली संगती मिळाली, चार स्वाध्याय मित्र मिळाले, परिवार मिळाला तर तरुण बिघडणार नाही, त्यांना भक्ती कळली आहे की नाही ते मला माहित नाही, परंतु तरुण बिघडणार नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. दहा स्वाध्यायी तरूण एकत्र आले तर त्यांना चांगली संगती लाभेल. अशा संगतीसाठी पण स्वाध्याय आहे. ही गोष्ट लोक समजत नाहीत.
सुखी घरातल्या मुलांना अत्यंत आवश्यकता आहे ती संगतीची. ज्याप्रमाणे जमवलेली लग्न होतात तसेच जमवलेली मित्रता झाली पाहिजे. रस्त्यात मैत्री तर जुगारासाठी, रेस साठी पण होऊ शकते. मग बाप म्हणतो आमचा मुलगा बिघडला. अरे! कां बिघडणार नाही? बाप, बघतच नाही त्याचा मित्र कसा आहे? येथे स्वाध्यायाला येणारे नव्वद टक्के लोक सांगू शकतात की, तरुणांना चांगली संगती मिळते, त्याला चांगला मित्रपरिवार मिळतो. तुम्ही त्याला चांगला मित्र शोधून दिला नाही तर तो कोणाशी पण मैत्री करेल.
आपल्या येथे आज आलेला तरुण उद्या शमो दम: तप: शौचं... युक्त होऊन जातो असे मला म्हणायचे नाही. पण त्याला चांगली संगती मिळेल, तो बिघडणार नाही. त्याच्या कर्तुत्वाला गंज चढणार नाही. म्हणून आपण स्वाध्यायात येतो त्यावेळेस पुष्कळ लोकांना नवल वाटेल की बेलबिटम पॅन्ट घालणारा गीता कशी म्हणतो? समविचारी मित्रपरिवारची तरुणांना आवश्यकता आहे. अशा तरुणांचा ग्रुप असावा. आपल्याला मुक्ती पाहिजे. मुक्ती पण वेगवेगळी असते. विकारमुक्ती, भयमुक्ती आणि वगैरे. आम्हाला मुक्ती समजून घ्यायची आहे. आम्हाला संगती पाहिजे. संगतीने संकल्प बदलतो. चांगली संगती मिळावी, विचारांची संगती मिळावी असा आग्रह ठेवला पाहिजे.
आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे, भक्ती समजून घ्यायची आहे आणि संगती मिळवायची आहे, अशा तीन मागण्या आहेत. गुणसंगती, विचारसंगती आणि देहसंगती मिळण्यासाठी सत्संगती आहे त्यासाठीच आपण एकत्र येतो.
Comments
Post a Comment