जीर्णोद्धार



जीर्णोद्धार
        तीर्थयात्रा, यज्ञ, मंदिर ते आता त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी कुणाला फुरसत नाही. कारण सगळ्या भक्तांचा एक तास भजनात जातो. व्यक्तीला व्यक्तीकडे पाहण्याची दृष्टी देऊन, विषमता काढून टाकण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे भक्ती. भक्ती एक सामाजिक शक्ती आहे. लोकांकड आम्ही प्रेमाने नेहमी जाऊ. भगवंत सर्वांचा आहे. माझा आणि दुसऱ्याचा संबंध आहे. मग आम्ही मंदिरात कशासाठी जातो. आम्ही भगवंताचे आहोत आणि ते पण भगवंताचे आहेत. अशा प्रकारे आम्ही भक्ती घेऊन जात असतो. त्यामुळे त्यांचे दुःख, दैन्य ,दारिद्र्य कमी होते. 
         या जगातून दुःख जाईल का? भगवंताने सर्वांना सुख दिले आहे. तरी पण सर्वजण लक्ष्मीनारायणा समोर दुःख व्यक्त करायला जातात. स्वतःजवळ काय काय आहे ते बघत नाहीत. काय नाही तेच पाहतात, आणि रडत राहतात. नेहमी विधायक दृष्टी ठेवली पाहिजे. माझ्याजवळ पण काही आहे, मी सुखी आहे. जे लोक रडतात त्यांना दृष्टी द्यावी लागेल. ही दृष्टी देण्यासाठी लोकांमध्ये तीर्थयात्रेच्या रूपाने जायचे आहे. 
       महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराजांनी गर्जना केली . अवघाची संसार सुखाचा करीन ! स्वतः तर मुक्त होतेच, आज लोक कृतीभक्ती विसरले आहेत. भगवान सर्वांना सुखी ठेवतो. भगवंताच्या दरबारात विषमता बिलकुल नाही. निसर्गाचे सुख सगळ्यांसाठी आहे. सूर्योदय सूर्यास्त पाहून गरीब असेल तो देखील आनंदित होतो. राजकुमाराला मांडीवर घेऊन बसण्याचा आनंद जेवढा राणीला होतो, तेवढाच आनंद मजुरी करत असलेल्या स्त्रीला आपल्या बालकाला मांडीवर घेतल्यावर होतो. झोपडीत राहणारी तरुणी पतीला पाहायला जेवढी अतुर असते, तेवढीच महालात राहणारी तरुणीपण आतूर आसते. दोघीही पतीला पाहिल्यावर लाजतातच. विकारांचे सुख सगळ्यांना सारखे आहे, झोपण्याचे सुख सर्वांना सारखे, भुकेचे सुख सुद्धा सर्वांना सारखे आहे. सर्वांच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत हे सर्वांना मान्य आहे. मग काय राहिले? दोन आण्याची सत्ता आपल्या हातात दिली आहे. 

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन