मंदिर - भगवंत कार्यात सगळ्यांना एकत्र आणण्याचे ठिकाण
मंदिर
सगळ्या गावाला भगवंतासोबत बांधून टाकले. एका भगवंताची लेकरे या नात्याने एकत्र बसण्यासाठी मंदिर बनवले. बुद्धिमान असेल, कोणी मंदबुद्धी असेल परंतु सारे जण मंदिरात एका ठिकाणी येतील आणि एकत्र बसतील. एका भगवंताची लेकरे आहोत ही जाणीव ठेवून बसतील. अशा प्रकारे ऋषीनी भक्ती उचलली. हे केवढी सुंदर व्यवस्था आहे?
मंदिरात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळेच एकत्र येतील. एका तत्त्वाने सूत्रे मणी गणा एवं| आपण बांधले आहोत. कुणी लखपती असेल, कोणी गरीब असेल, सर्वांना एकत्र मंदिरात बसायचं आहे. दुसऱ्याकडे भावपूर्वक पाहायचा आहे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे आहे. हे समजण्यासाठी मंदिरे होती. सर्वांचे सार्वत्रिक घर म्हणजे मंदिर होते. एकही व्यक्ती अशी नसावी की जी गावातील मंदिरात येत नसेल. हे लोक भावाने बांधलेले आहेत. म्हणून कुठलीही विषमता त्यांना त्रास देणार नाही. मंदिर असे हवे की जिथे सगळे लोक एका भगवंताची लेकरे बनवून एकत्र येतील.
आनंदाची गोष्ट अशी आहे की, आपले स्वाध्याय लोक असे मंदिरे बनवत आहेत. असे ऐक्य असलेले गावे उभी करत आहेत. व्यक्तीकडे पाहण्यासाठी कृतीभक्ती समजावली आहे. भावभक्ती साठी एकटे बसायचं आहे आणि कृतीभक्तीसाठी दुसऱ्याकडे जायचं आहे. कोणी बोलावले तर जायचं, असे नाही. मला कोणी बोलावले नाही तरी पण दुसऱ्याकडे जायचं आहे. तेवढ्यासाठी तीर्थयात्रा होती, यज्ञ होते, मंदिर होते.
Comments
Post a Comment